
Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन राज्य सरकारने तपास ‘सीआयडी’कडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार खासगी विमानाने २८ जानेवारीला मुंबईहून बारामतीला जात होते. लँडिंगवेळी विमानाला झालेल्या अपघातात पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्राथमिक तपास केला होता; तसेच अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. या अपघातासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आल्यानंतर तपास केवळ प्राथमिक स्वरूपापुरता मर्यादित न ठेवता स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
|
|
आता या प्रकरणी ‘सीआयडी’मार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. ‘बारामती तालुका पोलिस ठाण्यात नोंद असलेला अपघाती मृत्यूचा गुन्हा आता ‘सीआयडी’कडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती ‘सीआयडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेतेपद कुणाकडे जाईल, उपमुख्यमंत्री कोण होईल यावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीची मंडळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यासंदर्भात भाजपची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी तूर्त एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो; त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचा जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





1 thought on “Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास CIDकडे; प्रकरणाच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय”