Pune : विमान धावपट्टीवरुन बाजूला गेलं, अन्...; अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात विमान अपघाताची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बारामती येथील विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगदरम्यान विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू  झाला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे आज बारामतीत चार जाहीर कार्यक्रम नियोजित होते. त्या कार्यक्रमांसाठी ते सकाळी विमानाने बारामती येथे दाखल होत होते. मात्र, विमानतळावर उतरत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अपघात झाला अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Ajit Pawar Death : महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हरपलं; बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार नावाचं वारं सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत असायचे. राजांच्या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.



विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : विमान धावपट्टीवरुन बाजूला गेलं, अन्...; अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *