
Pune : पुणे शहरात महापालिका निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रियेत अनेक त्रुटी उघड्या पडल्या आहेत. विशेषतः सुसगाव भागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये ईव्हीएम यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मतदारांना आपलं मत नेमकं कुणाला पडलं, हे कळण्यासाठी आवश्यक असलेली व्हीव्हीपीएटी यंत्रे यावेळी ईव्हीएमसोबत ठेवण्यात आली नाहीत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यांनी या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची विधाने केली. त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की, मतदान एजंटने यंत्रणेची तपासणी केली आहे.
व्हीव्हीपीएटी सोबत ठेवण्यास नकार
या प्रकरणात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपीएटी यंत्रे उपलब्ध करवण्याची मागणी केली होती. इतकंच नव्हे तर, ते न्यायालयातही गेले होते. परंतु, आयोगाने न्यायालयातही ही मागणी फेटाळली आणि व्हीव्हीपीएटी सोबत ठेवण्यास नकार दिला. परिणामी, मतदारांना आपल्या मताची पडताळणी करण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय, मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण राहिले.
|
|
मोबाइल फोन बंद
मतदान केंद्रावर आणखी काही समस्या दिसून आल्या. मतदारांना त्यांचे मोबाइल फोन बंद करण्यास सांगितले जात होते. नाव शोधण्यातही गोंधळ उडाला, कारण एका मतदान बूथवर तब्बल ९०० नावांची यादी आहे. या सर्व गोष्टींमुळे मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह वाटली नाही. मतदारांनी या मुद्द्यांवरून तक्रारी नोंदवल्या, पण तात्काळ निराकरण झाले नाही.
एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर शहरवासीयांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे. शहरातील ४१ प्रभागांमधून एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला आहे. महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्र झाली. भाजपला दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडून आव्हान मिळत आहे, तर शिवसेना, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेही मैदानात उतरले आहेत.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel



1 thought on “Pune : पुणे महापालिका मतदानात गोंधळ! मतदान केलं… पण मत कुणाला गेलं कळेना; मतदार चक्रावले”