
नागपूर : मिहानमधील एआय इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (पूर्वीचे नाव एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस) एमआरओला फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात एफएएने मान्यता दिली आहे. त्यामुळे या एमआरओमध्ये आता ‘बोइंग 777’ची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती शक्य होणार आहे.
मिहानच्या आर्थिक विशेष क्षेत्रामध्ये (सेझ) सुमारे 50 एकर जागेवर एआयईएसएलचे एमआरओ आहे. येथे एअर इंडियाच्या विमानांची देखभाल-दुरुस्ती होते. याशिवाय, वर्षभरापासून येथे कुवेत एअरलाइन्सच्या विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येत आहे. अशात या एमआरओला एफएएने बोइंग 777 च्या डी-चेकसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे बोइंग 777 विमानाची संपूर्ण उकल करणे (डीअसेम्बलिंग) तसेच धड, पंख, लँडिंग गिअर, संरचना यांची सखोल तपासणी आणि मोठ्या स्वरूपातील दुरुस्ती शक्य होणार आहे.
|
|
ही तपासणी साधारणतः सहा ते 10 वर्षांतून एकदा केली जाते. विमान वाहतूक क्षेत्राचा विचार करता ही अत्यंत खर्चिक व वेळखाऊ अशा स्वरूपाची देखभाल असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही सुविधा मिहानमध्ये उपलब्ध होणे नागपूरच्या दृष्टीने मोठी उपलब्धी मानल्या जात आहे. अमेरिकेच्या एफएएकडून मिळणारी मान्यता ही विमान देखभालीच्या क्षेत्रातील सर्वात कठोर व विश्वासार्ह मानकांपैकी एक मानली जाते.
एआईएसएलच्या मिहानमधील एमआरओला ही मान्यता मिळाल्यामुळे येथे होणारी बोइंग 777 विमानांची देखभाल आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार वैध व विश्वासार्ह ठरणार आहे. या मान्यतेमुळे या एमआरओमधील विमानांच्या देखभाल क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. तसेच भारतातील एमआरओच्या रचनेला नवे बळ मिळाले आहे. या विस्तारामुळे नागपूर केंद्र देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी प्रमुख बोइंग 777 मेंटेनन्स हब म्हणून उदयास आले आहे. तसेच यामुळे विदेशातील एमआरओवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
जागतिक हबच्या दिशेने वाटचाल
एफएएच्या मान्यतेमुळे एआयईएसएलचे मिहान येथील एमआरओ ‘डी-चेक’ म्हणजेच विमान देखभालीच्या सर्वात व्यापक व गुंतागुंतीच्या टप्प्याचे काम करण्यास सक्षम झाले आहे. यासोबतच 4 हजार दिवस, 36 हजार तास उड्डाण आणि 18 हजार फ्लाइट सायकल्सपर्यंतच्या विमानांना सपोर्ट देण्याची पूर्ण क्षमता या केंद्रात निर्माण झाली आहे. त्यामुळे बोईंग 777 विमानांच्या संपूर्ण आयुष्यकालातील देखभाल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि भारताला जागतिक एमआरओ हब बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाउल ठरणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Nagpur : ऐतिहासिक पाऊल! ‘बोइंग 777’ मेंटेनन्ससाठी अमेरिकेची मंजुरी; नागपूर ठरतंय एव्हिएशन हब”