
Pune : पुणे मेट्रो प्रकल्प नेमका कोणाच्या पुढाकारामुळे मार्गी लागला आणि कोणामुळे रखडला, या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादाची ठिणगी पेटवल्यानंतर गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आरोप-प्रत्यारोपांच्या समिधा टाकून हा विस्तव आणखी पेटवला. श्रेयवादासाठी पुढे येणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी मेट्रो वेळेत पूर्ण केली असती, तर २०२६मध्ये त्यावरून निवडणुकीत संघर्ष करण्याची वेळ आली नसती.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात पुणे मेट्रोला मान्यता मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केला. त्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यामुळेच मेट्रोला विलंब झाल्याचे टीकास्त्र सोडले. 'अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवातीला मेट्रोसाठी निधी दिला नाही. त्यानंतर मेट्रो उन्नत स्वरूपात करायची, की भुयारी मार्गाने यावरून पवार आणि त्यांचा पक्ष संभ्रमात सापडल्याने त्याला आणखी विलंब झाला." माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने पुणे मेट्रोला मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री या नात्याने पुणे मेट्रोचे भूमिपूजनही मीच केले होते.
|
Pune : बोपदेव घाट पुढील ७ दिवस वाहतुकीसाठी बंद, पुणेकरांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन |
याचे उत्तर कोण देणार?
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात २०१४मध्ये आले. त्यानंतर प्रत्यक्षात पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता मिळण्यासाठी डिसेंबर २०१६ म्हणजे जवळपास दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या कालावधीत नागपूर मेट्रो गतीने पुढे सरकताना पुणे मेट्रोच्या प्रगतीत खीळ कोणी घातली? याचे उत्तर श्रेयवाद मेट्रोचा करणाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे.
दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर २००१ पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्यासाठी २०१४ पर्यंत फक्त चर्चाच सुरू होती. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना मेट्रोचे काम इंचभरही पुढे गेले नाही. त्यामुळे मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत,' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी केली. मोहोळ यांनी गुरुवारी पुणे मेट्रोतून प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना पुण्यातील मेट्रोला मंजुरी मिळाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मोहोळ यांनी पुणे मेट्रो रखडल्याचा सर्व इतिहासच सांगितला. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर बेंगळुरू व पुण्यात मेट्रो आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, राज्य सरकार व पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे ही बाब चर्चेपुरतीच मयादित राहिली.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन यांनी २००९ मध्ये पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुणे महापालिकेत सादर केला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने जून २०१० मध्ये केवळ वनाझ ते रामवाडी या एकाच मार्गिकेला मान्यता दिली. त्या असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या हद्दीतील मेट्रोचे अंतर अत्यंत कमी असल्याचे सांगून मेट्रोसाठी निधी देण्यास नकार दिला. परिणामी राज्य सरकारने २०१२ मध्ये एकाच मार्गिकचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. एकाच मार्गाला मंजुरी देता येत नसल्याचे सांगून केंद्राने या प्रस्ताव परत पाठवला. अखेर २०१३ मध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड दोन्ही पालिकांनी पुणे मेट्रोच्या एकत्रित प्रस्तावाला मान्यता दिली; परंतु त्यामुळे खर्च आठ हजार कोटींवरून दहा हजार १८३ कोटींवर पोहोचला, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शहर
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel





1 thought on “Pune : पुणे मेट्रोवर श्रेयाची लढाई! अजित पवारांवर आरोप, मुरलीधर मोहोळांचा प्रत्युत्तरात्मक हल्ला”