
Pune : थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नवीन उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण; देश-विदेशात ‘कंट्री डेस्क’ स्थापन होणार.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १ लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असून, त्यासाठी थेट परकीय गुंतवणूक (FDI) मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यावर भर देण्यात येणार आहे. याच उद्देशाने सरकारने नवे उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर केले असून, त्यामध्ये ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या एकात्मिक डिजिटल मंचाची घोषणा करण्यात आली आहे.
३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हे धोरण पुढील पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे. या धोरणांतर्गत ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या डिजिटल मंचावर सर्व क्षेत्रांतील गुंतवणूक प्रकल्प एकत्र आणून राज्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक व्यासपीठ तयार केले जाणार आहे.
या माध्यमातून राज्यात मूल्यवर्धित औद्योगिकीकरण, प्रादेशिक समतोल विकास, दरडोई उत्पन्नवाढ, भांडवल कार्यक्षमता, शाश्वत सुधारणा आणि पर्यावरणस्नेही औद्योगिकीकरणाला चालना देण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे महाराष्ट्राला जागतिक पातळीवर गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
|
|
______________
३ हजार कोटींची तरतूद, स्वतंत्र कंपनी स्थापन होणार
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या मंचाच्या माध्यमातून निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील प्रकल्पांना वित्तीय व बिगरवित्तीय प्रोत्साहन, व्यवसाय सुलभता, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
______________
जागतिक गुंतवणुकीसाठी ‘कंट्री डेस्क’
जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि व्यापारसंबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘कंट्री डेस्क’ स्थापन करण्यात येणार आहेत.
देशांतर्गत पातळीवर दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, स्वीडन, जर्मनी, दुबई, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि जपान येथे हे डेस्क सुरू केले जाणार आहेत.
______________
नवीन औद्योगिक धोरणातील ठळक मुद्दे
• उद्योग विभागाचे नाव बदलून उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग
• उद्योग संचालनालयाचे नाव बदलून उद्योग आयुक्तालय
• सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम आयुक्तालयाची निर्मिती
• सेवा उद्योगांसाठी स्वतंत्र सेवा आयुक्तालय
• धोरण अंमलबजावणीसाठी १ लाख १८ हजार २७५ कोटी रुपयांचा निधी
______________
उद्योग क्षेत्राकडून स्वागत
नवीन उद्योग धोरणाचे उद्योग क्षेत्राकडून स्वागत करण्यात आले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी या धोरणात एमएसएमईसाठी स्वतंत्र आयुक्तालय आणि जपान, जर्मनीसारख्या देशांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधी नेमण्यासारख्या मागण्यांचा समावेश केल्याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत. तसेच, धोरणाच्या अंमलबजावणीचे नियमित मूल्यमापन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel





1 thought on “Pune : राज्यात उद्योगधंद्यांना चालना! नवीन उद्योग धोरणातून ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ आणि ‘कंट्री डेस्क’ सुरू, गुंतवणूक वाढीसाठी उपाययोजना.”