
Pune : जीन्स घातल्याच्या रागातून एका ३३ वर्षीय महिलेला सासू, दीर, आणि मुलीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागात घडली. या मारहाणीत महिलेचा हात मोडल्याने तिला गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, की तक्रारदार कचरावेचक असून, त्या चार मुलांसह तळजाई वसाहत परिसरात राहतात. त्यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्या ३० डिसेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराबाहेर जीन्स घालून थांबल्या होत्या. त्या वेळी त्यांची सासू सविता तेथे आली आणि जीन्स घातल्याच्या रागातून सुनेचे केस ओढून मारहाण केली. तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला.
|
Jalna : जालन्यात भीषण अपघात, काही मिनिटांतच दोन्ही वाहने आगीत खाक; धडकी भरवणारा CCTV फुटेज समोर |
पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर त्यांची मोठी मुलगी घटनास्थळी आली. मात्र, तिनेही आईला मारहाण केली. पीडितेच्या दिराने तिचा डावा हात पिरगळला. या मारहाणीत महिलेचे मनगटाजवळील हाड मोडले. पीडितेच्या मुलांनाही धक्काबुक्की करण्यात आली. आरोपींनी महिलेचा मोबाइलही काढून घेतला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेला ससून रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली असता मनगटाचे हाड फॅक्चर झाल्याचे आढळले.
या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर होणाऱ्या हिंसाचाराचा हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. पोलिसांकडून आरोपी सासू, दीर आणि मुलीविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधित कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पीडित महिलेच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. तसेच, मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बालकल्याण समितीला याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Pune : ‘तू जीन्स का घातली?’ तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन; विधवा महिलेने जीन्स घातल्याने दीर-सासूकडून छळ, पुण्यात धक्कादायक प्रकार उघड”