
Pune : पुणे मेट्रो प्रकल्पाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून, सरलेल्या वर्षात (२०२५) मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवरील तिकीट विक्रीतून ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ला (महामेट्रो) १०५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. या दोन्ही मार्गांवर वर्षभरात सहा कोटी ७१ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ७५ लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केल्याचे दिसून येत आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन्ही मार्गिका गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झाल्या. त्यानंतर गेल्यावर्षीच मेट्रोची प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. नव्या वर्षातही त्यामध्ये सातत्याने वाढ होत राहिली. त्यामुळे जून महिन्यात मेट्रोने प्रवासी संख्येचा ५० लाखांचा टप्पा पहिल्यांदा ओलांडला. त्यानंतर सणासुदीच्या काळात आणि विशेषतः गणेशोत्सव कालावधीत मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या काळात मेट्रोची प्रवासी संख्या ७० लाख व त्यापुढे पोहोचली; तसेच उत्पन्नाने १० कोटी रुपयांच्या पुढे मजल मारली.
|
|
दिवाळीच्या सुट्ट्यांपासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत अंशतः घट झाली असली, तरी सरासरी दोन लाख प्रवासी दररोज प्रवास करत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवर गेल्या वर्षभरात सर्वाधिक तीन कोटी ६५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेवर तीन कोटी ५ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
वर्ष प्रवासी उत्पन्न
२०२४ ३.९० कोटी ६० कोटी रुपये
२०२५ ६.७१ कोटी १०५ कोटी रुपये
सर्वाधिक प्रवासी: ७५,९२,३१९ (सप्टेंबर २०२४)
सर्वाधिक उत्पन्न : ११ कोटी ७० लाख रुपये (सप्टेंबर २०२४)
या दोन मार्गिकांमध्ये कायमच वनाझ ते रामवाडी मार्गिकेवर प्रवाशांची संख्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेपक्षा अधिक होती. वर्षात फक्त ऑक्टोबरमध्ये वनाझ-रामवाडी या मार्गिकेपेक्षा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेवर प्रवासी अधिक होते. या महिन्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावर ३१.९० लाख, तर वनाझ ते रामवाडी मार्गावर २७.४१ लाख प्रवाशांची नोंद झाली.
यंदा हिंजवडी-शिवजीनगर मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असून, मार्च 2026मध्ये ही मार्गिका देखील सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


