
Pune : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची पावणेअकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. हर्षद सुभाष धनतोले (वय 23) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय 24, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिकारी असल्याचं सांगितलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनतोले आणि देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर संपर्क साधून स्वतःला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवले. काळ्या पैशांच्या व्यवहारात संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर झाल्याचा आरोप करून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येणार असल्याची भीती दाखवली; तसेच या प्रकरणात कुटुंबीयांनाही अटक होऊ शकते, असे सांगून दिलेल्या बँक खात्यात तातडीने रक्कम जमा करण्यास भाग पाडले. भीतीपोटी ज्येष्ठ नागरिकाने आरोपींनी सांगितलेल्या खात्यात दहा कोटी 74 हजार रुपये जमा केले. काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ATM मधून रक्कम काढल्याचं समोर
तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. संबंधित बँक खात्याची छाननी करण्यात आली; तसेच आरोपींनी शहरातील काही एटीएममधून रक्कम काढल्याचे उघड झाले. एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, निरीक्षक संगीता देवकाते, सहायक निरीक्षक अर्चना कटके, उपनिरीक्षक सुशील डमरे, अजित बढे, कृष्णकांत देसाई, रवींद्र साळवी, जान्हवी भडेकर, गंगाधर काळे, नवनाथ कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सायबर चोरटे एखाद्या व्यक्तीची फसवणूक केल्यानंतर संबंधित रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. बऱ्याच व्यवहारांनंतर प्रत्यक्षात ती रक्कम ताब्यात घेतली जाते. मात्र, या घटनेतील सायबर चोरट्यांनी एटीएममधून पैसे काढल्याने ते पोलिसांच्या डोळ्यावर आले. त्यांनी एटीएममधून रोकड काढली नसती, तर त्यांचा शोध लावणे अवघड बनले असते.
ठळक मुद्दे
अटक आरोपींकडून चाल लाख 78 हजार रुपयांची रोकड जप्त
त्यांच्या बँक खात्यातील सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम गोठवली
उर्वरित रकमेचा शोध सुरु
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




