Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात डोक्यात दगड घालून तरुणाच्या खून

पुणे : पुणे रेल्‍वे स्‍टेशन परिसरात डोक्‍यात दगड टाकून तरूणाचा खून झाल्‍याची घटना समोर आली आहे. खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र खून झालेला हा व्यक्ती फिरस्ता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

पुणे रेल्वे स्टेशन भागात मालधक्का परिसरात मारुती मंदिराजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. तरुणाची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असण्याची शक्यता आहे. तो फिरस्ता असल्याचा संशय पोलिसांना आहे. तोंडावर दगड मारल्‍याने ओळख पटत नसून याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *