Pune : 31 डिसेंबर–1 जानेवारीला पुण्यात मोठे वाहतूक बदल; अवजड वाहनांसह काही मार्गांवर वाहतूक बंदी, पर्यायी मार्ग जाहीर

Pune :  पुण्यातील महत्त्वाच्या मार्गांवर दोन दिवस मोठे वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 दरम्यान काही मार्गांवर वाहतूक बंद व वळवण्यात येणार असल्याने नागरिकांना न्यू इयरला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी 1 जानेवारी 2026 रोजी लाखो नागरिक दाखल होणार आहेत. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुधवार, 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

Pune : पुण्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग! मध्यरात्री दोन्ही राष्ट्रवादींची गुप्त बैठक, काका–पुतण्या एकत्र येणार की नवा ट्विस्ट? तासाभरात काय ठरलं?

राज्याच्या विविध भागांतून नागरिक विजयस्तंभ अभिवादन समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार दुपारपासून नगर रस्त्यावर वाहतुकीत बदल लागू करण्यात येणार असून, हे बदल 1 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.

पुण्याहून नगरकडे जाणारी वाहने खराडी बायपासमार्गे मुंडवा, मगरपट्टा चौक, पुणे–सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर मार्गे नगर रस्त्याकडे वळवण्यात येतील. सोलापूर रस्त्यावरून आळंदी आणि चाकणकडे जाणारी वाहने हडपसर, मगरपट्टा चौक आणि खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडीकडे जातील. तेथून ही वाहने पुढे आळंदी आणि चाकणकडे जातील. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा मार्गे नगरकडे प्रवास करावा.

मुंबईहून नगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ आणि शिरूर मार्गे नगरकडे जातील. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कात्रज येथून मांतरवाडी फाटा व मगरपट्टा चौकमार्गे नगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या चालकांनी हडपसर आणि केडगाव चौफुला मार्गे शिरूरच्या दिशेने प्रवास करावा.

इंद्रायणी नदीवरील आळंदी–तुळापूर पूल अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, केवळ भाविकांच्या हलक्या वाहनांनाच या पुलावरून जाण्याची परवानगी दिली जाईल. विश्रांतवाडी आणि लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी अवजड वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

शहरात अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकी येथील हॅरिस ब्रिज, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेर येथील राधा चौक, सिंहगड रस्त्यावरील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खाडी मशीन चौक, फुरसुंगीतील मांतरवाडी फाटा आणि मार्कल पुलाकडून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *