Pune : ‘वेल्थ प्लॅनेट’ घोटाळा—गुंतवणूकदारांची फसवणूक सिद्ध; तीन अधिकारी दोषी, दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Pune : कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांच्या रकमेचा अपहार करून त्यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी 'वेल्थ प्लॅनेट कंपनी'च्या तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांनी हा निकाल दिला.

कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित संजय कुलकर्णी (वय ३९), कंपनीतील विविध टीमची प्रमुख प्रज्ञा कुलकर्णी (वय ४७, दोघे रा. नारायण पेठ, मूळ रा. धुळे) आणि मुख्य कामकाज अधिकारी श्वेता श्रीधर नातू (वय ३४, रा. सावंतवाडी) यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात पाषाण येथे राहणाऱ्या गृहिणीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हा प्रकार नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान घडला होता.

Pune : मुलीच्या फोटोसह भावनिक स्टेटसनंतर गायब झालेले निखिल रणदिवे अखेर सापडले;; तब्बल पाच दिवस कुठे होते?

आरोपींनी फॉरेन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास नफ्यातील साठ टक्के वाटा गुंतवणूकदारांना मिळेल, असे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी गुंतवणूक स्वरुपात एकूण ४८ लाख ९१ हजार ८५० रुपये आरोपींच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, त्याचे गुंतवणूक प्रमाणपत्र वारंवार मागणी करूनही आरोपींनी दिले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी आरोपींच्या कार्यालयात धाव घेत गुंतवणुकीची मुद्दल परत मागितली. त्यावर आरोपींनी तक्रारदारांना वेगवेगळ्या रकमेचे धनादेश दिले. मात्र, बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटले नाहीत.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील कुंडलिक चौरे यांनी सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी तक्रारदारांना एक लाख ६२ हजार रुपये परत केले; तर उर्वरित ४७लाख २९ हजार ८५० रुपये तक्रारदारांना देण्यासाठी न्यायालयात जमा केले. मात्र, आरोपींनी फौजदारीपात्र विश्वासघात आणि ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *