
Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला आहे. याचं काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झालेय. एप्रिल २०२६ पर्यंत हा केबल स्टे ब्रिज खुला होण्याची शक्यता आहे. हा ब्रिज सुरू झाल्यास दोन शहरातील प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी कमी होणार आहे. दोन बोगदे आणि दोन पुलांसह हा भव्य प्रकल्प वाहनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सध्या मिसिंग लिंकचे काम जोरात सुरू आहे. त्याअंतर्गत साह्याद्रीच्या पर्वतरांगेत केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला आहे. १८२ मीटर उंच असणारा या ब्रिजचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. सह्याद्री पर्वतरांगेत या केबल स्टे ब्रिजच्या बांधकामात जोरदार वारे, धुके आणि पावसाचे मोठे आव्हान होते. याचे काम सुरू करण्यापूर्वी MSRDC प्रशासनाला वाऱ्याचा वेग कमी होण्याची आणि धुके कमी होण्याची दररोज वाट पहावी लागत आहे.
|
|
MSRDC कडून दोन डोंगरामध्ये केबल-स्टेड पूल उभारला जात आहे. याचे काम फक्त ५ टक्के राहिलेय. हा ब्रिज खुला झाल्यास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. १८२ मीटर उंचीच्या या पुलावरील वाहने १३२ मीटर उंची ओलांडून एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जातील. त्यामुळे सहा कमी अंतर कमी होणार आहे. यामुळे वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. घाटातून प्रवास करण्याची गरजही भासणार नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचे खोपोली एक्झिट आणि सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान सध्या १९ किमी अंतर आहे. मिसिंग लिंकच्या बांधकामामुळे हे अंतर १३.३ किमीपर्यंत कमी होईल. या प्रकल्पात दोन बोगदे आणि दोन केबल पूल बांधण्यात आलेत. १३.३३ किमी पैकी बोगदा ११ किमी लांब असेल आणि केबल पूल अंदाजे २ किमी लांब आहे. ८५० मीटर लांब आणि २६ मीटर रुंद असलेले हे दोन केबल पूल दोन टप्प्यात बांधले जात आहेत. बोगद्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे, तर केबल पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती MSRDC च्या एका अधिकाऱ्याने दिली.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उभारण्यात येत असलेला हा केबल-स्टेड पूल वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षा ५५ मीटर उंच आहे. सी लिंकचा केबल ब्रिज १२८ मीटर उंच आहे. ब्रिजचे खांब उभारण्यासाठी चार १८२ मीटर टॉवर क्रेनचा वापर करण्यात आला. वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन या ब्रिजची रचना करण्यात आली. या ब्रिजवरून वाहने १०० किमी वेगाने धावतील. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी एप्रिलमध्ये हा ब्रिज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
शहर
- आषाढी वारी पालखी मार्गावर 'फूड सेफ्टी'ची कडक नजर; हॉटेल आणि अन्नदान केंद्रांची होणार तपासणी!
- व्हेनेझुएलातून मृतदेह आला, पण अवयव गायब! भारतीय खलाशाच्या मृत्यूचे गूढ वाढले; कुटुंबियांची सीबीआय चौकशीची मागणी!
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! लोकलच्या आरपीएफ आणि जीआरपीमध्ये तब्बल २,५५९ पदे रिक्त; कर्मचारी तुटवड्याचा मोठा फटका!
महाराष्ट्र
- आषाढी वारी पालखी मार्गावर 'फूड सेफ्टी'ची कडक नजर; हॉटेल आणि अन्नदान केंद्रांची होणार तपासणी!
- आषाढी वारीसाठी आळंदीत कडक निर्बंध! ४ ते ९ जुलैदरम्यान विवाह, साखरपुडा आणि मंगलकार्यांवर बंदी
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! लोकलच्या आरपीएफ आणि जीआरपीमध्ये तब्बल २,५५९ पदे रिक्त; कर्मचारी तुटवड्याचा मोठा फटका!
गुन्हा
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जगन्नाथ रथयात्रा २०२६: १६ जुलैला भक्तांचा महासागर लोटणार; जाणून घ्या रथयात्रेचे महत्त्व, विधी आणि संपूर्ण माहिती!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.

























Subscribe to my channel



