
Pune : पुणे मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात आणखी ३२ किलोमीटरची भर घालणाऱ्या खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग अशा दोन मेट्रो रेल्वे मार्गांच्या नऊ हजार ८५८ कोटी रुपयांच्या विस्ताराच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जोडण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बदलापूर-कर्जतदरम्यानच्या एक हजार ३२४ कोटींच्या प्रत्येकी ३२ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मेट्रो विस्ताराला मिळालेल्या आजच्या मंजुरीमुळे खडकवासला, कोथरूड, वारजे, माणिकबाग, राजाराम पूल या दाट लोकसंख्येच्या भागांमध्ये मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुढची अनेक दशके पुणे शहराच्या विकासाला बळ मिळत राहील, असा विश्वास केंद्रीय माहिती व नभोवाणीमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. देशातील अव्वल दहा शहरांमध्ये आणि सर्वांत मोठ्या शहरांमध्ये समावेश असलेल्या व ८० लाखांहून अधिक लोकसंख्येसह
|
|
महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर असलेल्या पुणे शहराच्या मेट्रो रेल्वे जाळ्याचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये यापूर्वी घेण्यात आला आहे. पुण्यातील उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम मेट्रो रेल्वे मार्गिका सप्टेंबर २०२४ पासून कार्यान्वित झाल्या असून, दररोज अडीच लाख प्रवासी त्यांचा वापर करतात. यंदा गणेशोत्सवादरम्यान या दोन्ही मार्गावर सुमारे पाच लाख ९० हजार प्रवाशांनी प्रवास करत उच्चांक गाठला आहे. आज मंजुरी दिलेल्या विस्तार प्रकल्पांमुळे पुणे मेट्रो रेल्वेचे जाळे १०० किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन करणार आहे. देशात आतापर्यंत २० हून अधिक शहरांमधील मेट्रो रेल्वेचे जाळे एक हजार ८३ किलोमीटरवर पोहोचले असून भारत हा मेट्रोचे जगातील दुसरे सर्वाधिक मोठे जाळे असलेला देश बनला आहे.
पुणे मेट्रोच्या मंजुरी मिळालेल्या दोन मार्गांचा तपशील खराडी ते खडकवासला
लांबी: २५.५ किमी
स्थानकः २२
नळ स्टॉप ते माणिकबाग
लांबी: ६.१ किमी
स्थानकः ६
२८ स्थानके - ९ हजार ८५८ कोटी रुपये गुंतवणूक
प्रकल्प कालावधी - ५ वर्षे
एकूण लांबी - ३१. ६४ किमी
पुणे मेट्रोच्या प्रगतीपथावरील मार्गाचा तपशील माण-हिंजवडी ते शिवाजी नगर
लांबी: २३.२ किलोमीटर
खर्चः ८ हजार ३१३ कोटी रुपये
स्वारगेट ते काझी
लांबी: ५.५ किलोमीटर
खर्चः २ हजार ९५४ कोटी रुपये
निगडी ते पिंपरी-चिंचवड मनपा
लांबी: ४.४ किलोमीटर
खर्च: 910 कोटी रुपये
वनाज ते चांदणी चौक
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




