
Pune : हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमारआरडीए) निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात झाली उन्नत मार्ग, भुयारी मार्ग, रस्त्यावर सिग्नल, खड्ड्यांची दुरुस्ती आदी उपाययोजनांचा नियोजनाचा आढावा बुधवारी घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी हिंजवडी आणि औद्योगिक परिसरातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात जुलै महिन्यात बैठक घेतली होती. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे महानगरआयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी बैठक घेतली.
|
Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! मोदी सरकारकडून पुणे मेट्रोच्या दोन महत्त्वाच्या मार्गिकांना हिरवा कंदील |
अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे,पिंपरी-चिंचवडचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, प्रादेशिक धिकारी अर्चना पाठारे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश नांदूरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, ‘पीएमआरडीए’चे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक श्वेता पाटील यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हिंजवडी येथील नवीन प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपदनाबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला. रस्त्यांचे १८ प्रस्ताव दाखल झाले असून, त्यापैकी तीन रस्त्यांची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये बैठक घेण्यात येणार आहे.
हिंजवडी-पिरंगुट-घोटावडे राज्यमार्गावरील हिंजवडी फेज एक (विप्रो सर्क ) ते हिंजवडी फेज-३ (माण) दरम्यानचा रस्ता आणि त्यावरील उन्नत मार्गासाठी ‘एमआयडीसी’कडून भूसंपादन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तसा प्रस्ताव सादर करण्याची सूचना डाॅ. म्हसे यांनी केली. मेट्रो मार्गिकेचे काम झाल्यानंतर डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत करून तो ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित करण्याचे निश्चित करण्यात आले.
पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्गालगतच्या भूगाव गावठाण येथील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी भूगाव बाह्यवळण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीचे भूसंपादन ‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची लांबी ८५० मीटर असून, रुंदी १८ मीटर आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या आठवड्यात काम सुरू करण्याबाबतचे आदेश ठेकेदाराला दिले जाणार आहेत.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर आणि वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे-अहिल्यानगर मार्गास समांतर ३० मीटर रस्ते नियोजन नकाशानुसार खराडी जकात नाका ते केसनंद तसे बकोरी रस्ता हा वाघोली बाह्यवळण रस्ता असून, रस्त्याच्या सीमांकनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वाघोली ते केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केसनंद चौक बायपास करून पुणे-अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतचा नवीन वाघोली, केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
सुरभी हाॅटेल ते भावडी, लोहगाव रस्ता, तुळापूर-भावडी-वाघेश्वर मंदिर आणि आव्हाळवाडी ते मांजरी खुर्द रस्त्याचे भूसंपादन तातडीने करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
– पाच डिसेंबरपूर्वीपर्यंत रस्ते खड्डेमुक्त
– हिंजवडीतील नव्या रस्त्यांच्या कामांना गती
– हिंजवडीतील उन्नत मार्गासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव
– कामयस्वरूपी सिग्नल बसविण्यासाठी तातडीने निधी
– धोकादायक डंपर चालविणाऱ्यांवर कारवाई
– पुणे-मुंबई मार्गावर भुयारी मार्ग आणि सेवा रस्ते
– भूगाव बाह्यवण रस्त्यासाठी भूसंपादन
-शिक्रापूर-वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्ते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा बैठक घेण्यात आली. वाहतूक कोंडी सोडविणयाच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. – डाॅ. योगेश म्हसे, महानगरआयुक्त, ‘पीएमआरडीए’
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



