
Pune : नवले पुलावर होणारे अपघात रोखण्याबरोबरच जड वाहनांची वाहतूक वळविण्यासाठी 'एमएसआरडीसी' आणि 'पीएमआरडीए' यांच्या रिंगरोडच्या पर्यायांची जिल्हा प्रशासनाने पाहणी केली. त्यात 'पीएमआरडीए'च्या रिंगरोडचा पर्याय पुढे आला आहे.
जांभूळवाडी येथून थेट पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे स्टेडियमदरम्यान रस्त्यांचे काम केल्यास नवले पुलाला पर्याय निघू शकतो, यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे. त्यावर दोन दिवसांत बैठक घेऊन काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी दिली.
|
Pune : पुण्यात अपघातांची मालिका कायम… गरवारे कॉलेज चौकात मध्यरात्री भीषण धडक; तिघेजण गंभीर जखमी |
नवले पुलाजवळ दहा दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारच्या विविध विभागांकडून तातडीने उपयोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने रिंगरोडचा पर्याय पुढे आणला आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार महामार्ग (इनर रिंगरोड), तर एमएसआरडीसीकडून बाह्य वर्तुळाकार महामार्गाचे (आउटर रिंगरोड) काम हाती घेण्यात आले आहे.
नवले पुलाच्या परिसरातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरसीडी) रिंगरोड जातो. परंतु, तो भूमिगत असल्यामुळे ते काम होण्यास विलंब होऊ शकतो. या उलट 'पीएमआरडीए'चा रिंगरोड जांभूळवाडीमधून थेट गहुंजे स्टेडियमजवळ निघतो. सुमारे ४० किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड आहे. त्या रस्त्याचे काम गतीने मार्गी लागू शकते. त्यामुळे या पर्यायावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, "पीएमआरडीएचा रिंगरोड ज्या गावांतून जाणार आहे, त्या गावांतील सर्व जमिनींची मोजणी पूर्ण झाली आहे. तीन गावांतील भूसंपादनाचे दरदेखील निश्चित झाले आहेत. उर्वरित गावांतील दर निश्चितीचे काम एक महिन्यात पूर्ण होईल. त्यासाठी या आठवड्यात बैठक बोलविली आहे. त्यामुळे रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागू शकते. या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे."
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




