
Pune : गेल्या सहा महिन्यांत वहिवाटीची मोजणी केलेल्यांना हद्द कायमची मोजणी करून घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या संधीचा फायदा पन्नास टक्क्यांहून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी करून घेतला.
मात्र, अद्यापही हद्द कायम करून घेतली नाही अशा बांधकाम व्यावसायिकांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यांची मोजणी रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. वहिवाटीची मोजणी बंद केल्यानंतरदेखील या पद्धतीने जमिनीची मोजणी करून घेतलेली पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीएसह पुणे जिल्ह्यात सुमारे एक हजार ४०० प्रकरणे समोर आली आहेत.
|
|
त्यांना भूमी अभिलेख विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना एक संधी देऊन हद्द कायमची मोजणी करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यास दोन महिने झाले. या नोटिशीला प्रतिसाद देत काही बांधकाम व्यावसायिकांनी हद्द कायमची मोजणी करून घेतली. मात्र, अद्यापही काही व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे विभागाने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेली वहिवाट पद्धतीने मोजणी करण्याची पद्धत भूमी अभिलेख विभागाने बंद केली. ही पद्धत बंद करण्यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात जमाबंदी आयुक्तांनी परिपत्रक काढले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत मोजणी कार्यालयाकडून ही पद्धत सुरूच ठेवली होती.
हे लक्षात आल्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा जमाबंदी आयुक्तांनी परिपत्रक काढत वहिवाटीची मोजणी तातडीने बंद करण्याबाबत आणि फेब्रुवारीपासून वहिवाटीच्या मोजणीसाठी पैसे भरून मोजणी करून दिलेल्या प्रकरणांची माहिती प्रत्येक कार्यालयाकडून मागवली होती. त्यानुसार या प्रकरणांची संख्या जवळपास एक हजार ४०० इतके असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सहाशे ते सातशे प्रकरणे होती.
संधी देऊनही प्रतिसाद नाही
संबंधित अर्जदारांना एक संधी देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. या सर्वांना सप्टेंबरमध्ये नोटिसा बजाविण्यात आल्या. त्यानंतर काही व्यावसायिकांनी हद्द कायमची मोजणी करून घेतली. मात्र, मोजणी न घेतलेल्यांना आता अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लवकरच मोजणी रद्दची प्रक्रिया
नोटिसा बजावल्यानंतर बऱ्याच बांधकाम व्यावसायिकांनी हद्द कायमची मोजणी करून घेतली. ज्यांनी अद्याप करून घेतली नाही, त्यांची मोजणी रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे जमाबंदी आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
शहर
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
- कोल्हापूर: स्वतःच्या खिशातून खर्च, अडीच किमी जंगलवाट अन् ११ विद्यार्थ्यांसाठी अथक धडपड; शिक्षक पांडुरंग चव्हाणांचा प्रेरणादायी प्रवास
- सोलापूर: शंभर टक्के दृष्टी नसतानाही अंधत्वावर मात करत सुजित शिंदेंची क्लास वन शिक्षणाधिकारी पदाला ऐतिहासिक गवसणी
- पुणे: जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास; कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
महाराष्ट्र
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
- कोल्हापूर: स्वतःच्या खिशातून खर्च, अडीच किमी जंगलवाट अन् ११ विद्यार्थ्यांसाठी अथक धडपड; शिक्षक पांडुरंग चव्हाणांचा प्रेरणादायी प्रवास
- सोलापूर: शंभर टक्के दृष्टी नसतानाही अंधत्वावर मात करत सुजित शिंदेंची क्लास वन शिक्षणाधिकारी पदाला ऐतिहासिक गवसणी
- पुणे: जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास; कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
गुन्हा
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले


























Subscribe to my channel



