
Pune : पुण्यातील नवले पुलावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने या पुलाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येणार आहे. येत्या २५ नोव्हेंबर पासून सर्व वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा निश्चित केली जाणार आहे. शिवाय या मर्यादांचे पालन न केल्यास त्या चालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे - मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर होणाऱ्या वाढत्या अपघातांची क्रमवारी लक्षात घेता, तसेच वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.
|
Pune : सिंहगड घाट आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाचा आदेश जारी, पर्यायी मार्ग जाहीर |
यापूर्वी फक्त नवले पुलावर वेगमर्यादा ठरवण्यात आली होती. आता भूमकर चौक ते नवले ब्रीजपर्यंत ही वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. हा नवीन आदेश दिनांक २५/११/२०२५ पासून लागू करण्यात येत आहे. या नव्या वेगमर्यादेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या नव्या वेगमर्यादेमुळे वाहतुक कोंडी होण्याचीही शक्यता आहे.
नवले पुलावर तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग आपोआप वाढतो. तीव्र उतार असल्याने अनेक वाहन चालक गाडी न्युट्रल करतात आणि त्यानंतर उतारामुळे पुन्हा नियंत्रण मिळवणे अवघड होते. आता वेगमर्यादा ठरवल्याने वाहन चालकांनी नियमांचे कठोर पालन करावे असं आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न केल्यास सीसीटीव्ही, स्पीड गनने लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान नियम बदलल्या नंतर तरी या पुलावरील अपघाताचे प्रमाण कमी होणार का? आणि मृत्यूचा सापळा बनलेला नवले पूला चा टॅग पुसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


