
Mumbai : एकाच रूममध्ये एक तरुण आणि वृद्ध सोबत राहत होते. मात्र सिम कार्ड चोरल्याचा संशय घेत रूम सोडण्यास सांगितल्याचा कारणातून दोघांमध्ये वाद झाला. या कारणावरून संतापलेल्या तरुणाने ६४ वर्षीय वृद्धाचा गळा आवडून खून केल्याची धक्कादायक घटना वांद्रे पश्चिम परिसरात घडली आहे. या घटनेने खडबड उडाली असून मारेकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वांद्रे पश्चिम येथील मेहबूब स्टुडिओज जवळील सार्वजनिक शौचालयात केअरटेकर म्हणून काम करत असलेले शिवजी बनारसिंग (वय ६४) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती शिवजी बनारसिंग आणि त्याचा रूममेट असलेला संजय यादव (वय २८) हे दोघेही मेहबूब स्टुडिओजजवळील सार्वजनिक शौचालयाच्या वरच्या मजल्यावर एकत्र राहत होते. दरम्यान ९ ऑक्टोबरला दुपारी शिवजी यांनी सिम कार्ड हरवल्याने यादव याच्यावर संशय घेतला. या कारणावरून त्याला खोली सोडण्यास सांगितले.
हत्या केल्यानंतर मारेकरी रुममध्येच थांबून
याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला आणि क्षणातच तो रागाच्या भरात हिंसक वळणावर गेला. यामध्ये आरोपी संजय यादव याने शिवजींचा गळा दाबून जीवे ठार मारले. तर घटनेनंतर यादव शांतपणे तिथेच थांबला होता. संध्याकाळी शौचालय व्यवस्थापकाने शिवजींना बेशुद्ध अवस्थेत पाहून पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता यादव तिथे उपस्थित होता. शिवजींना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मारेकरीस पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासात मानेवरील खुणा आणि कानातून रक्तस्राव आढळल्याने हत्या झाल्याचा संशय बळावला. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर घटनेच्या वेळी खोलीत फक्त यादव आणि शिवजी असल्याचे स्पष्ट झाले. अखेर चौकशीत यादवने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. वांद्रे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, न्यायालयाने आरोपीला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




