
Konkan Mhada House : म्हाडा लॉटरीतील स्वस्तातील घराचे स्वप्न म्हटले की अर्जदारांची झुंबड उडते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. म्हाडा कोकण मंडळाच्या २० टक्के योजनेत नवी मुंबईतील सानपाडा येथील दोन अत्यल्प उत्पन्न गटाच्या घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज आलेत. इतकेच नव्हे तर अल्प उत्पन्न गटातील केवळ १७ घरांसाठी तब्बल १८,२२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 'नशीबात असेल तरच म्हाडाचे घर मिळेल! अशी आता अर्जदारांची स्थिती झालीये.
म्हाडा कोकण मंडळाकडून 2025 या वर्षासाठी तब्बल 5354 घरे लॉटरीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घरांसाठी अर्जदारांकडून अक्षरशा झुंबड उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे घरांच्या किमतीही अत्यंत अल्प आहेत.सानपाड्यातील अत्यल्प उत्पन्न गटाचे २९ चौ.मी. क्षेत्रफळाचे घर १४.४२ लाख रुपये तर अल्प उत्पन्न गटाचे ३७ ते ४९ चौ.मी. क्षेत्रफळाचे घर १८ ते २४ लाख रुपये किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोकण मंडळाने जाहीर केलेल्या ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांसाठी एकूण १.८४ लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १.५८ लाख अर्ज अनामत रकमेसह आहेत. यामध्ये सर्वाधिक मागणी खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या २० टक्के योजनेतील ५६५ घरांसाठी तब्बल १.४६ लाख अर्जांची झाली आहे.
याउलट १५ टक्के योजनेला अर्जदारांनी पाठ फिरवली आहे. आता ३ हजारांहून अधिक घरांसाठी फक्त ४,९८५ अर्ज आले आहेत. विखुरलेल्या इतर १६७७ घरांसाठी ५,०४६ अर्ज आणि ५० टक्के योजनेतील ४१ घरांसाठी १,३३८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी अर्जदारांची झुंबड पाहता ‘म्हाडा लॉटरी’ ही आता नशिबाची खरी परीक्षा ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सानपाड्यातील दोन घरांसाठी आलेल्या 6156 अर्जदारांमधून कोणाचे भाग्य उजाळेल हे सोडतीच्या दिवशीच समजणार आहे.
शहर
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 'या' सोप्या पद्धतीने करा पुन्हा सुरू!
महाराष्ट्र
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
गुन्हा
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
- नागपूरमध्ये बनावट औषधांचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सहा जणांवर गुन्हे दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




