
Pune : भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात मोलाची भूमिका बजावणारे आणि १९७१च्या युद्धानंतर पाकिस्तानात युद्धकैदी म्हणून पकडले गेल्यानंतर तिथून तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी बेत आखून तो तडीस नेण्याचा प्रयत्न करणारे ग्रुप कॅप्टन (नि.) दिलीप कमलाकर परुळकर (८२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. १९७१ च्या युद्धावेळी रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या युद्धकैद्यांच्या छावणीतून दोन सहकाऱ्यांसह त्यांनी केलेल्या यशस्वी पलायनाची घटना खूप गाजली होती.
परुळकर मार्च १९६३ मध्ये भारताच्या हवाई दलात रुजू झाले. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केले. डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीमध्ये ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर होते. तसेच, दोन वर्षे सिंगापूर येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) बटालियन कमांडर म्हणूनही योगदान दिले. १९६५ मध्ये भारत पाकिस्तान युद्धावेळी शत्रूच्या गोळीबाराने त्यांच्या विमानाला इजा झाली, तसेच त्यांच्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले होते. मात्र, त्यानंतरही विमान उडवून ते यशस्वीरीत्या तळावर परतले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना वायुसेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
|
Shocking News : शेतजमिनीसाठी बनला हैवान; आईच्या हत्येनंतर मुलानं स्वत:लाही संपवलं |
भारताच्या हवाई दलाने परुळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘१९७१ च्या युद्धावेळी विंग कमांडर डी. के. परुळकर यांनी प्रचंड शौर्य दाखवले. पाकिस्तानात युद्धकैदी असताना त्यांनी दोन सहकाऱ्यांसह सैन्याच्या छावणीतून पलायन केले. त्यांनी दाखवलेला निर्धार, शौर्य हे हवाई दलाच्या सर्वोत्तम परंपरेतील होते. त्यांच्या त्या कृतीमुळे शत्रूला हवाई दलाचे सामर्थ्य केवळ आकाशातच नाही, तर जमिनीवरही असल्याचे मान्य करून कौतुक करावे लागले होते,’ असे हवाई दलाने समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तानात युद्धकैदी असताना तेव्हा फ्लाइट लेफ्टनंट रँक असलेल्या परुळकर यांनी पाकिस्तानच्या ताब्यातून सुटून भारतात पळून येण्याचा धाडसी बेत आखला. त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचे बारीक नियोजन केले. फ्ला. ले. ग्रेवाल आणि फ्ला. ले. हरिश सिंहजी या इतर दोन सहकाऱ्यांसह ते तुरुंगातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. कुठलाही संशय येऊ नये, म्हणून त्यांनी ताबारेषेकडे (एलओसी) येण्याऐवजी ते अफगाणिस्तानच्या सीमेकडे जाण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातून सुटल्यावर पेशावर, लंडी कॅनालपर्यंत ते गेले. अफगाणिस्तानच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असतानाच तेथील गावकऱ्यांना त्यांच्या हालचाली पाहून संशय आला आणि त्यांना पुन्हा ताब्यात घेतले गेले. नंतर १९७२ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून पळून जाण्याची कथा साऱ्या जगभर गाजली. त्यांच्या या धाडसाची अंगावर रोमांच उभे करणारी कथा फेथ जॉन्स्टन यांनी ‘फोर माइल्स टू फ्रीडम’ या पुस्तकात लिहिली आहे.‘द ग्रेट इंडियन एस्केप – खुले आसमान की ओर’ नावाचा चित्रपटही त्यावर निघाला आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



