
Pune : सकाळची नेहमीची धावपळ, ऑफिसला पोहोचण्याची घाई आणि काही क्षणांतच आयुष्य संपलं… पुण्यातील वानवडी परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरने एका तरुण इंजिनिअरचा बळी घेतल्याने शहर हादरलं आहे.
ग्रेसिया डॅनियल इसा (वय २४, रा. केदारीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गंगा सॅटेलाइट परिसरातील नाल्यावरील पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. ग्रेसिया खाजगी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. त्या दिवशी कामानिमित्त तिला लवकर ऑफिसला जायचे होते.
दुचाकीवरून जात असताना वळणावर भरधाव येणाऱ्या पाण्याच्या टँकरने तिच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर कोसळली आणि टँकरच्या चाकाखाली आल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत तिला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी टँकर चालक संतोषकुमार मोर्या (वय ४५) याने अपघातानंतर स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गेल्या ४८ तासांत टँकरच्या धडकेत मृत्यूची ही दुसरी घटना ठरल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात वाढलेल्या टँकर वाहतुकीमुळे रस्ते अधिक धोकादायक बनत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः वळणांवर वेगावर नियंत्रण नसणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन ही अपघातामागची प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.
“अशा घटना वारंवार घडत आहेत. टँकर वाहतुकीवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घरातून बाहेर पडलेला व्यक्ती सुरक्षितपणे परत येईल का, अशी भीती पुणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




