
Nashik Accident : पालकांनो तुमची मुले रस्त्यावर खेळत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. बऱ्याचदा मुलं खेळता खेळता पालकांचा डोळा चुकवून रस्त्यावर जातात आणि अपघाताला सामोरे जातात. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकच्या अंबड परिसरात शुक्रवारी घडली. २ वर्षांचा चिमुकला पालकांची नजर चुकवून रस्त्यावर खेळत असताना मागून येणाऱ्या रिक्षाची धडक त्याला बसली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा अंत झाला.याप्रकरणी पोलिस तपास करत आहे. रिक्षा चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या आझाद नगर अंबड येथे २ वर्षीय अदनान फिरोज शेख याचा रिक्षाच्या धडकेत काल शुक्रवारी मृत्यू झाला. घरच्या समोर खेळत असताना रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने चिमुकल्याला उडवले. रिक्षाच्या धडकेत अदनान गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना चिमुकल्याचा मृत्यू झाला. रिक्षा चालक अखिलेश यादव वर्षे ४४ याच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरीकांनी रिक्षा चालकाला पकडून चोप दिला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरीष्ठ निरीक्षक मधुकर कड यांचे पथक याप्रकरणी तपास करत आहे.
वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून नांदेडमध्ये १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
नांदेड मधून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षीय विद्यार्थ्याचा वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेलमध्ये शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहेत. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. तो सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आठ दिवसापूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यानंतर तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. या प्रकरणी विमानातळ पोलिसांकडून तपास सुरु आहे.
दरम्यान, १२ वर्षाच्या वैभवचा पडून नेमका मृत्यू कसा झाला? याचा अधिकचा तपास पोलिस घेत आहेत. याबाबतची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं असले तरी पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
शहर
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम अनुभवा! गोव्यातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन.
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
महाराष्ट्र
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- लातूरमध्ये महिलांचा संताप! शिरूर अनंतपाळमध्ये महामार्गावरील अवैध दारू अड्ड्यावर महिलांचा हल्ला; दारू अड्ड्याची केली तोडफोड.
- राज्यातील १२ दुय्यम निबंधक कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात; कागदपत्रांची छाननी न करताच दस्त नोंदणीचा 'धडाका'!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
गुन्हा
- माणुसकीला काळीमा! ६ महिन्यांच्या गरोदर पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; बादलीत तोंड बुडवून संपवला जीव.
- लग्नाचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा! नवरी मुलगी आणि मध्यस्थाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठ्या टोळीचा पर्दाफाश.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
- भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी! २७५ एसएससी (SSC) अधिकारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २७ जुलैपर्यंत आहे शेवटची मुदत.
- रिटायरमेंटनंतर पूर्ण पेन्शन हवंय? नोकरी सोडताना 'या' EPFO डॉक्युमेंटला बिलकुल विसरू नका!



























Subscribe to my channel

