Shocking : ३ तास उलटा लटकवला, गुप्तांगाला स्पर्श अन् लघवी पाजण्याचा प्रयत्न; तरूणाला बेदम मारहाण

Shocking : फरीदाबादच्या बल्लभगढमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षीय तरूणाला ३ तास डांबून ठेवत त्याच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी तरूणाला आधी उलटे लटकवले. नंतर त्याचे टक्कल केले. तसेच भुवया आणि मिशा कापल्या. नंतर जबरदस्तीने त्याला लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. तरूणाची सुटका झाल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती दुसऱ्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. वैयक्तिक वैर असल्याकारणाने आरोपींनी पीडिताला छळलं. दरम्यान, पीडिताच्या कुटुंबाने याला हिंसाचार म्हटलं आहे. कुटुंबाचा आरोप आहे की, हल्लेखोरांनी जातीशी संबंधित अपशब्द वापरले होते. पीडिताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 'रविवारी रात्री याच लोकांनी त्याला मारहाण केली, तसेच धमकीही दिली'.

Pune to Satara : पुणे– सातारा आता सुसाट जा, रेल्वेच्या दुहेरीकरणातील अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण

पोलीस तपासानुसार, सोमवारी ४ ते ७ वाजेपर्यंत पीडिताला एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं. छताच्या हुकला उलटा लटकवलं. काठ्यांनी मारहाण केली. तसेच गुप्तांगाला स्पर्श केला. हल्ल्यानंतर आरोपींनी त्याला घराबाहेर फेकून दिलं. त्याला वाचवण्यासाठी पीडितेचा भाऊ तेथे पोहोचला. त्यावेळीस पीडितेने चुलत भावाला सांगितले की, तो इतका घाबरला होता की, त्याने कुटुंबाला पोलिसांकडे तक्रार करू नये अशी विनंती केली.

मात्र, पीडिताच्या कुटुंबाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ११ वर्षीय आरोपीला अटक न्यायलयात हजर करून तुरूंगात पाठवलं आहे. तर, २ अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर, दुसरा संशयित आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, तरूणाची प्रकृती बरी झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाईल, असं पोलीस यशपाल यादव यांनी सांगितलं.

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *