
Pune Indrayani Kundmala river bridge collapse News Update : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला अन् अनेकजण वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५१ जणांना वाचवण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते. पण सततच्या पावसामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय, आणखी तीन ते चार जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनडीआरएफचे जवान आज पुन्हा नदीत उतरणार आहेत. ज्यावेळी इंद्रायणी नदीवरून पूल कोसळला त्यावेळी तिथे १०० पेक्षा जास्त पर्याटक असल्याचं सांगण्यात येत आहे.
पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल रविवारी दुपारच्या वेळीस कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. पूल कोसळला तेव्हा सुमारे १०० पर्यटक उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) रविवारी रात्रीपर्यंत ५१ जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढले. यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पवना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात १० जणांवर उपचार झाले, त्यापैकी दोघे आयसीयूमध्ये होते, तर उर्वरितांना किरकोळ जखमांमुळे घरी सोडण्यात आले.
|
Maval : मोठी बातमी! पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २० ते २५ जण पर्यटक वाहून गेल्याची भीती |
आणखी दोन ते तीन जण बेपत्ता -
काल रात्रीपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वेग वाढला आहे. यामुळे एनडीआरएफसमोर बचावकार्यासाठी मोठे आव्हान आहे. पूलाचा लोखंडी सांगाडा रविवारी रात्री नदीतून काढण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनुसार, आणखी दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफने सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू केले. प्रशासनाकडे बेपत्ता लोकांची नेमकी संख्या उपलब्ध नसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ युद्धपातळीवर कार्यरत असून, पावसामुळे बचावकार्य कठीण बनले आहे.
दोषींवर कठोर कारवाई करणार, अजित पवार
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!




























Subscribe to my channel
