
Kedarnath : केदारनाथहून चार धाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंडजवळ कोसळून सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांमध्ये पायलट आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. गौरीकुंडपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या गौरी माई खार्क येथे हे हेलिकॉप्टर कोसळले.
या घटनेबद्दल माहिती देताना, कायदा आणि सुव्यवस्था महानिरीक्षक नीलेश भरणे म्हणाले, “रविवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास, केदारनाथहून गुप्तकाशीला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. ते गौरीकुंडमध्ये कोसळले, ज्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. आम्ही अपघाताचे कारण शोधत आहोत.”
|
|
दरम्यान या अपघातात पायलट कॅप्टन राजबीर सिंग चौहान, विक्रम रावत, विनोद देवी, त्रिशती सिंग, राजकुमार सुरेश जयस्वाल, श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत पीडित जयपूर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान या अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली असून, मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळ कठीण आणि दुर्गम जंगल क्षेत्रात असल्याने बचाव कार्य आव्हानात्मक आहे, असे सडीआरएफ ने सांगितले आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाकडून याबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, १५ जून रोजी सकाळी ५:२० वाजता आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर VTBKA/BELL ४०७ गौरीकुंडजवळ कोसळले. हेलिकॉप्टर केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जात होते. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण ६ प्रवासी होते. यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. हेलिकॉप्टरमधील प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्याजवळ झालेल्या या हेलिकॉप्टर अपघाताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार “एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथकांना मदत आणि बचाव कार्याला सुरूवात केली आहे.”
यापूर्वी ८ मे रोजी गंगोत्रीला जाताना एका हेलिकॉप्टर दरीत कोसळून पाच प्रवासी आणि एका पायलटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ जून रोजी केदारनाथला पाच प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे खबरदारी म्हणून त्याचे रस्त्यावर लँडिंग करण्यात आले होते.
गढवालचे आयजी राजीव स्वरूप यांनी सांगितले की, “अपघातग्रस्त हेलिकॉप्टर केदारनाथला यात्रेकरूंना घेऊन गेल्यानंतर गौरीकुंडला गेले होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ते अतिशय दुर्गम ठिकाण आहे. पोलीस आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.
शहर
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
महाराष्ट्र
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




