Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

Pune : समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तनुज माकीन (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तनुज यांची समाज माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर तरुणी आणि आरोपी तनुजची मैत्री झाली. तनुजने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिला हडपसर भागातील सदनिकेत बोलावून घेतले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझ्याबरोबर विवाह करायचा असेल तर तुझी छायाचित्रे पाठवून दे’, असे त्याने तिला सांगितले. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिच्याशी बोलणे बंद केले.

Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा

तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा ‘माझा नाद सोड नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांना जिवे मारू’, अशी धमकी त्याने दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *