
Pune : हडपसर विधानसभा मतदारसंघातील चौरंगी लढतीमध्ये महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाने केलेली बंडखोरी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारासाठी अडचणीची ठरणार की नाही? याचे उत्तर निकालानंतर मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना बंडखोर उमेदवार कोणाची मते घेणार यावर या मतदारसंघाच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी वाढल्याने मतांचे दान ज्या उमेदवाराच्या पदरात पडेल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात अधिक मतदार असलेला मतदारसंघ म्हणून हडपसर मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात ६ लाख २५ हजार मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदारांची संख्या एक लाख २० हजाराने वाढली असून मतदानाच्या टक्क्यातही वाढ झाली आहे. २०१९ मध्ये हडपसरमध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होेते. या निवडणुकीत ते ५०.११ टक्क्यांवर गेले आहे. तीन टक्के मतदान वाढले असले तरी शहराच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत मात्र सर्वात कमी मतदान याच मतदारसंघात झाले आहे.
|
|
महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप, मनसेकडून साईनाथ बाबर तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बंडखोर गंगाधर बधे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. मागील निवडणुकीत तुपे यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा अवघ्या पावणेतीन हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते तुपे यांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली होती. मोरे यांना ३५ हजार, एमआयएमच्या उमेदवाराला ८ हजार तर वंचितच्या उमेदवाराला साडेसात हजार मते मिळाली होती.
आमदार तुपे यांनी पराभव केलेले टिळेकर या निवडणुकीत तुपे यांच्या बरोबर होते. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक बधे यांना शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पाठिंबा देत त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे प्रशांत जगताप यांच्या अडचणी वाढल्या. मनसे आणि अपक्ष उमेदवार या निवडणुकीत कोणाची मते घेणार यावर या मतदारसंघाचा विजय अवलंबून आहे.
‘एम’ फॅक्टर चा फायदा कोणाला?
हडपसरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या मतदारसंघात मराठा, माळी, मुस्लिम आणि मराठवाडा असा ‘एम’ फॅक्टर चालतो. हा वर्ग कोणाच्या मागे उभा राहिला, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. हडपसरमध्ये प्रत्येकवेळी नवीन आमदार होतो, अशी परंपरा आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील ही परंपरा सुरू राहणार की दोनवेळा आमदार होण्याचा नवीन इतिहास घडणार हे शनिवारी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


