
Pune : ‘बटेगे तो कटेंगे’ हे वास्तव असून, त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती-जातींमध्ये लोक विभागले गेले, की त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण आपल्या पद्धतीने घेत असतो, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. या वेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. तावडे म्हणाले, की विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यात दौरा करत असताना सामान्य मतदाराची भावना समजून घेतली, तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमत पलीकडे जाईल, असे चित्र आहे. लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या. त्यामुळे अनेकांच्या मनात विविध कल्पना निर्माण झाल्या आहेत. मात्र, विधानसभेसाठी अनेक पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील.
|
|
मराठा आरक्षणाबाबत बोलताना तावडे म्हणाले, की मराठा समाजाच्या प्रश्नावर कोणी आंदोलन केले, तर ते चांगलेच आहे. यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यानंतर याबाबत विविध मागण्या वेळोवेळी समोर आल्या. मंडल आयोगाच्या माध्यमातून देखील आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना मराठा आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात ते टिकवून दाखवले, तरी मराठा नेते मनोज जरांगे भाजपला दोष देत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, हिंदुत्व आणि कलम ३७० याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. जातनिहाय जनगणना करून लोकसंख्या टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी सांगत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही विनोद तावडे म्हणाले.
सभेच्या ठिकाणी पाऊस पडल्यास जिंकण्याचा भ्रम
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणारी व्यक्ती उद्या पाऊस कुठे आहे, हे पाहून त्यांच्या सभेचे आयोजन करते, अशी खोचक टीका तावडे यांनी केली. त्यांच्या सभा ज्या ठिकाणी होतात तिथे पाऊस पडल्यावर जागा जिंकता येतात हा भ्रम आहे. साताऱ्यामधील लोकसभेची जागा आम्ही जिंकली नाही, तरी विधानसभेची जिंकली आहे, असा टोला तावडे यांनी लगावला.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे सांगत माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून, आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीमध्ये निवडणूक निकालानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



