
Pune : शहरात विविध ठिकाणी बेकायदा फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ झाला आहे. याबाबत तक्रारी येऊ लागल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विमानतळ पोलिसांनी चार फटाका विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे आहेत.
फटाका विक्री दुकानांना अग्निशमन दल, महापालिका, तसेच पोलिसांकडून परवानगी दिली जाते. परवानगी देण्यापूर्वी अटी, शर्तींची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यानंतर फटाका विक्रेत्यांना परवानगी दिली जाते. शहराच्या मध्य भागातील वर्तक बाग, गोळीबार मैदान परिसरात फटाके विक्री दुकाने आहेत. तेथील फटाका विक्रेत्यांना परवाना दिला जातो. दिवाळीची सांगता होईपर्यंत तेथे पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या जातात. तेथे अग्निशमन दलाचे जवान आणि बंबही ठेवण्यात येतात. बेकायदा फटाका विक्री दुकाने सुरू करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
उपनगरातील काही विक्रेत्यांनी बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडल्याच्या तक्रारी, तसेच माहिती आहे. अशा दुकानदारांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले. नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलजवळ सुरू करण्यात आलेल्या फटाका विक्री दुकानचालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
|
|
लोहगावमधील संतनगर परिसरातील गुरुराज फटाका मार्टच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. संतनगर परिसरातील महालक्ष्मी फटाका मार्ट, तसेच लोहगावमधील भाजी मंडई परिसरातील एकदंत फटाका स्टाॅलच्या मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय नागरिक संहिता सुरक्षा २०२३ चे कलम ३५ (३) अन्वये पोलिसांनी फटाका विक्रेत्यांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.
रहिवासी भागात परवानगीशिवाय फटाका विक्री दुकाने सुरू करणाऱ्या दुकानमालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रहिवासी भागात फटाका विक्री दुकानात आग लागल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. पोलीस, महापालिका प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या फटाका विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. बेकायदा फटाका विक्रीची दुकाने आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी. पोलीस ठाण्यात जप्त फटाके नको
पोलिसांनी विमाननगर, लोहगाव भागातील बेकायदा फटाका विक्री दुकानांवर कारवाई केली. पोलिसांनी तेथील फटाका विक्री दुकाने काढून टाकण्याचे आदेश दिले. फटाके जप्त करून पोलीस ठाण्यात ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांनी फटाके जप्तीपेक्षा थेट दुकानमालकांना समज देऊन फटाक्यांसह दुकानच काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यात जप्त केलेले फटाके ठेवल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




