
Pune : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच राजकीय समीकरणांना मोठा ट्विस्ट मिळाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत उमेदवार देणार असल्याची घोषणा केली असून, त्यामुळे ही निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून, २३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. मात्र लक्ष्मण हाके यांच्या घोषणेमुळे हे समीकरण आता बदलण्याची शक्यता आहे.
“बारामतीत आम्ही निवडणूक लढणारच” – लक्ष्मण हाके
या संदर्भात बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले,
“आम्ही बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहोत. योग्य वेळी उमेदवार जाहीर करू. अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. काही राष्ट्रीय पक्षसुद्धा इच्छुक आहेत. चर्चा सुरू आहेत, पण काहीही झालं तरी आम्ही ही निवडणूक लढणारच.”
-“लोकशाहीसाठी निवडणूक आवश्यक”
हाके यांनी यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांचा उल्लेख करत म्हटलं,
“महाराष्ट्रात याआधीही अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत. एखाद्या नेत्याच्या निधनानंतरही निवडणुका झालेल्या आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका होणं गरजेचं आहे. बिनविरोध निवडणुका होणं लोकशाहीसाठी घातक ठरू शकतं.” दोन दिवसांत उमेदवार जाहीर पुढे बोलताना ते म्हणाले,“आम्ही रस्त्यावर लढणारे कार्यकर्ते आहोत. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणार आहोत. जनता ठरवेल काय योग्य आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा करू. बारामतीची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत.
सुनेत्रा पवारांबाबतही विधान
हाके यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबतही मत व्यक्त करत म्हटलं,
“त्यांना बिनविरोध विधान परिषदेत पाठवावं. आणि सत्ताधाऱ्यांनी आपला कार्यकर्ता निवडणुकीत उतरवावा. विविध पक्ष आमच्या भूमिकेशी सहमत आहेत. बारामतीत ओबीसी मतदार एकत्र आले तर मोठं राजकीय चित्र बदलू शकतं.”बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा असतानाच आता ती थेट लढतीत जाण्याची शक्यता वाढली आहे. पुढील दोन दिवसांत उमेदवार जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीचं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
शहर
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; डॉ. तात्याराव लहाने,सयाजी शिंदे, यांच्या उपस्थितित मोबाइल ॲपचा लोकार्पण सोहळा जगद्गुरू नरेंद्राचार्य
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.


























Subscribe to my channel


