
Chinchwad : चिंचवड विधानसभेतून महायुतीचे नेते नाना काटे शरद पवार गटात जाण्यासाठी चाचपणी करत असतानाच आता त्यांचे प्रतिस्पर्धी चिंचवड पोट निवडणूक अपक्ष लढलेले राहुल कलाटे देखील शरद पवार गटात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे. जागावाटपावरून राजकारण रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपमधील शहराध्यक्ष शंकर जगताप, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते आदी इच्छुक उमेदवार आहेत. असं असताना आता महायुती मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे हे देखील इच्छुक आहेत. ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
|
Mumbai Mega Block On Western Line : पश्चिम रेल्वेवर साडेसहा तासांचा ब्लॉक |
काटे हे शरद पवार गटात जाण्यासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष लढणारे शिवसेना ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभेची तयारी सुरू केली आहे. परंतु, कलाटे यांचा अद्याप पक्ष ठरलेला नाही. चिंचवड पोटनिवडणुकीपासून राहुल कलाटे हे शिवसेना ठाकरे गटापासून दूर आहेत. त्यांना अपक्ष लढावं लागल्याने ते पक्षावर नाराज होते. राहुल कलाटे यांच्यावर पक्षाने कारवाई केलेली नाही, असं स्वतः कलाटे यांनी सांगितलं आहे.
कलाटे यांना खंबीर साथीची अपेक्षा आहे. ते काही नेत्यांच्या भेटी घेत आहेत. असं देखील त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. नाना काटे यांनी महायुतीची चिंचवड विधानसभेची जागा भाजपला गेल्यास, योग्य तो निर्णय घेऊन अपक्ष किंवा इतर पक्षातून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुतीतील या गुंतागुंतीमुळे नाना काटे शरद पवार गटात जाण्यासाठी अनुकूल आहेत. तसं त्यांनी वातावरण तयार केलेलं आहे. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. परंतु, काटे की कलाटे यांना शरद पवार गटात स्थान मिळतं हे बघावं लागेल.
शहर
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; मोबाइल ॲपच्या लोकार्पणासह जगद्गुरू नरेंद्राचार्यजींशी माध्यमांचा विशेष संवाद
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.



























Subscribe to my channel


