
Sangli : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म खुंटीला टांगून अपक्षासाठी एकत्र आलेल्या सांगलीतील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गटबाजीची बीजे दिसू लागली आहेत. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांच्या विरोधात बोलणार्यांचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनावेळी ही गटबाजी प्रकर्षाने समोर आली. या गटबाजीवर नियंत्रण ठेवून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणे हेच या निवडणुकीत काँग्रेसपुढे आव्हान राहण्याची चिन्हे आहेत.
खासदार विशाल पाटील यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेने जागा वाटप जाहीर होण्यापुर्वीच पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. खाली काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी खासदार विशाल पाटील यांना सोबत घेउन जागा वाटपाचा लढा अगदी दिीपर्यंत नेला. अखेर महाविकास आघाडीने या मागणीचा विचार केला नाही. उमेदवारीच्या घोळामागे जिल्ह्यातीलच एक मोठा नेता असल्याचा समज जाणीवपूर्वक माध्यमातून पेरण्यात आला. अखेर काँग्रेसचीच बंडखोरी असल्याचा दावा करत खासदार पाटील यांची उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल झाली.
|
|
\महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून या उमेदवारीला समर्थन न देताही डॉ. कदम यांना आपली जिल्ह्यातील ताकद दाखवावी वाटली. आणि ती त्यांनी भाजपचा मोठ्या फरकाने पराभव करून दाखवून दिली. यामागे कदम यांच्या गटाची ताकद तर होतीच, पण याचबरोबर वसंतदादा घराण्याची श्रध्दाही होती. दादा घराण्याने ही अस्तित्वाची लढाई केल्याने आणि लोकांनीच निवडणूूक हातात घेतल्याने अपक्षाचा विजय झाला. विजयानंतर खासदार पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.
तथापि, या निवडणुकीत खासदार पाटील यांना सांगलीमध्ये १९ हजाराहून अधिक मताधियय मिळाल्याने काँग्रेसची ताकद लक्षात आली. भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असल्याने काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. एवढेच नाही तर जर काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तरी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करत विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तथापि, गत निवडणुकीत भाजपला कडवी झुंज देत सहा हजार मतांनी पराभूत झालेले शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचाही काँग्रेसच्या उमेदवारीवर प्रबळ दावा आहे. अशा स्थितीत गेल्या दोन दिवसात राहूल गांधी यांच्याविरोधात बोलणार्या विरोधी नेत्यांचा निषेध करण्यासाठी तीन स्वतंत्र आंदोलने सांगलीकरांना पाहण्यास मिळाली.
महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि खासदार पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बुधवारी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध केला. तर श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाखालील मदन पाटील युवा मंचने मंगळवारी आमदार गायकवाड यांचा निषेध केला. प्रदेश काँग्रेस समितीकडून आदेश आल्यानंतर पुन्हा गुरूवारी निषेध आंदोलन करण्यात आले. तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही स्वतंत्र रित्या निषेध आंदोलन केले. यावरून काँग्रेसमध्ये गटबाजी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र सांगलीकरांना पाहण्यास मिळाले. स्व. पतंगराव कदम यांचे एक वायय यामुळे पुन्हा पुन्हा आठवते ते म्हणजे काँग्रेसचा पराभव केवळ काँग्रेसच करू शकते, अन्य पक्षामध्ये तेवढी ताकद नाही हेच खरे म्हणायचे का? आता या स्वतंत्र आंदोलनानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांची भूमिका काय हे उमेदवारीच्या वाटपावेळी समोर येईलच. तोपर्यंत सवतासुभा हीच काँग्रेसची संस्कृती म्हणावी लागेल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



