
Lalbaug : मुंबईमध्ये भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव बसने ९ जणांना चिरडले. लालबाग परिसरात रविवारी रात्री ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर ८ जणांवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी एक जणाला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सव्वा आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बेस्ट बसची मार्गिका क्रमांक ६६ नंबरची बस लालबागवरून जात असताना हा अपघात झाला. ही बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. यावेळी ही बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली असता एका मद्यधुंद प्रवाशाने काही क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला.
|
|
हा प्रवासी थेट चालकाच्या केबिनजवळ गेला. प्रवाशाचे बस धावत असताना चालकाला स्टेअरिंगवरून ओढण्याचा प्रयत्न केला. त्याने डाव्या बाजूने बसचे स्टेअरिंग हातात घेत ते फिरवले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत ९ जणांना चिरडले.
अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना त्यांनी तात्काळ केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले. या भीषण अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. जखमी पादचाऱ्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर केईएमच्या आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. श्रेया मणियार आणि नुपुरा मणियार असं त्यांची नावं आहेत.
या भीषण अपघातामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कार आणि दुचाकींचा समावेश आहे. पोलिसांनी हा अपघात ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मद्यधुंद प्रवासी दत्ता शिंदेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहर
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
महाराष्ट्र
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.

























Subscribe to my channel



