
Pune : गणेशोत्सवासह विविध उत्सवांमध्ये वापरली जाणारी प्लास्टिकची फुले, रंगीत, नक्षीदार प्लास्टिकच्या माळा आणि सजावट साहित्यावर बंदीचा निर्णयच घेतला जात नसल्याने या वर्षीही बाजारपेठांमध्ये निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या फुलांचे असंख्य प्रकार दाखल झाले आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) आदेश देऊनही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक फुले, सजावट साहित्यावर बंदी घातलेली नाही.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
प्लास्टिक बंदीबाबत प्रशासकीय पातळीवरच दुर्लक्ष होत असल्याने बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिकची सर्रास विक्री होत आहे. काही वर्षांपूर्वी थर्मोकोल बंदी आल्यानंतर उत्सवातील सजावटीच्या साहित्यामध्ये प्लास्टिकचा वापर वाढत गेला. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी एकल वापर प्लास्टिकच्या (सिंगल यूज) वापरावर बंदी आणली. मात्र, त्या यादीत सजावट साहित्यातील निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचा समावेश झाला नाही. त्यामुळे या त्रुटीचा गैरफायदा घेऊन विक्रेत्यांनी या वस्तूंची विक्री सुरू ठेवली. प्रशासनानेही प्लास्टिक बंदीच्या जुन्या नियमावलीवर बोट ठेवून विक्रेत्यांवर कारवाईस टाळाटाळ केली.
एनजीटीचा आदेश
सजावट साहित्यातील प्लास्टिक फुलांचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) पुणे न्यायपीठासमोर दोन वर्षांपूर्वी दाखल झाली होती. प्लास्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याची सबब याचिकेत देण्यात आली होती. त्याची दखल घेऊन एनजीटीने या प्रकरणी केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी समिती स्थापन करून नियमावली तयार करण्याचे आदेश दिला होता. गेल्याच वर्षी मंडळाने समितीही नेमली; पण या समितीचे निर्देश अद्याप स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी सजावट साहित्याबाबत सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे.
|
Mumbai : अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मुंबईतील दोन प्रकरणे उघडकीस |
‘यादीत समावेश नाही’
प्रशासकीय पातळीवरील अनास्थेचा फायदा घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये असंख्य प्रकारचे निकृष्ट दर्जाचे प्लास्टिकचे सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. उत्सवादरम्यान वापरले जाणारे प्लास्टिकचे बहुतांश सजावट साहित्य ‘सिंगल यूज’ प्रकारात मोडते; मात्र केंद्र सरकारने बंदी आणलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये प्लास्टिकची फुले आणि या सजावट साहित्याचा समावेश केलेला नाही, त्यामुळे आम्हाला कारवाई करता येत नाही, या प्लास्टिकच्या रंगीत फुलांचा समावेश बंदीमध्ये करावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
फुले त्रासदायक आहेत कारण
- कृत्रिम फुलांसाठी प्रामुख्याने पॉलिथिनचा वापर होतो.
- केंद्र सरकारने शंभर मायक्रॉनच्या आतील पॉलिथिनवर बंदी जाहीर केली आहे.
- बाजारातील प्लास्टिकच्या फुलांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, पॉलिथिनची जाडी सरासरी २९ मायक्रॉन आढळली.
- या फुलांसाठी वापरलेले रासायनिक रंग पर्यावरणीयदृष्ट्या घातक आहेत.
- कालांतराने साहित्याचा रंग फिका होतो, हळूहळू प्लास्टिकचे तुकडेही होतात.
- निकृष्ट दर्जामुळे या प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही.
केंद्र सरकारच्या पातळीवर सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंची यादीमध्ये सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा समावेश नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत या साहित्याचे वाढते उत्पादन आणि निकृष्ट दर्जा लक्षात घेऊन त्यावरील बंदीसाठी दोन वर्षांपूर्वी एनजीटीकडे याचिका दाखल झाली होती. न्यायाधिकरणानेही दखल घेऊन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह आठ सदस्यांची समिती नेमली. मात्र, समितीने दिलेला अहवाल वर्ष उलटूनही एनजीटीपर्यंत सरकारने पोहोचवलेला नाही. या दिरंगाईमुळे बाजारपेठेत सिंगल युज सजावट साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे. -
स्टिकच्या साहित्याने व्यापली बाजारपेठ
- विक्रेते म्हणतात, प्लास्टिकला दुसरा रास्त दरातील पर्याय नाही, त्यामुळे आम्ही विक्री करतो
- प्लास्टिकच्या वस्तूंचे प्रमाण दर वर्षी वाढतच आहे.
- प्लास्टिकच्या माळा, हार, झुंबर, मखरासाठी खांब, कळस, प्लास्टिकची मंदिरेही बाजारात उपलब्ध.
- लाइटच्या माळांमध्येही प्लास्टिकची फुले, पानांचा वापर वाढला.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




