
Pune News : पिंपरी चिंचवड फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून फसवणुकीचा एक प्रकार समोर आला आहे. नार्कोटिक्स डिर्पाटमेंटमधून बोलत असल्याचे महिलेला सांगण्यात आलं. पार्सलमध्ये ड्रग्ज, अंमली पदार्थ असल्याने ते कस्टम विभागाने पकडले असून अटकेची भिती घालून महिलेची २४ लाख ९९ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केली. आता पोलिसांनी चार आरोपीना पिंपरी चिंचवडच्या सायबर सेलकडून अहमदनगर, जळगाव, सुरत येथून ताब्यात घेतलं आहे. यात आणखी एक धकादायक बाब समोर आली आहे.
यापैकी एक आरोपी हा नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील माजी उपनगराध्यक्षा मीनल अशोक खांबेकर यांचा मुलगा आहे. तसंच त्याचे वडील अशोक खांबेकर हे साई संस्थांनचे माजी विश्वस्थ होते.
स्वरुप अशोक खांबेकर (वय ४२ रा. साईकृपा, इंदिरापथ, संभाजी चौकाजवळ, कोपरगाव, जि. अहमदनगर) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून माहिती घेऊन पुष्कर चंद्रकांत पाखले रा. प्लॉट नंबर ३९, सिधुरत्न, करगांव रोड, विदयुत लता कॉलनी समोर, चाळीसगाव, जळगाव यास जळगाव येथून तर मोनिक भरतभाई रंगोलिया रा. ए १६, महालक्ष्मी सोसायटी, पुनाग्राम, योगी चौक, सुरत, कौसिक मन्सुखभाई बोरड रा. २१०, हरिकुंज सोसायटी, चिकुवाडी, वराच्या रोड, सुरत यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडी येथील एका महिलेने फिर्याद दिली होती.
|
Pune : पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजुरीसाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिघांना पकडले |
कशी झाली फसवणूक?
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवडी येथे राहणाऱ्या एका महिलेला आरोपींनी तिच्या मोबाईलवर फोन करून फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर सर्विसेसमधून बोलत आहोत असं सांगितलं. तुमच्या नावाचे मुंबई येथून इराणला पाठवलेले पार्सल फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर सर्विस येथे मुंबई कस्टम डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी पकडले आहे. त्यामध्ये ड्रग्ज, अंमली पदार्थ, ५ क्रेडीट कार्ड, १ लॅपटॉप आणि ५ एक्सपायर्ड इराणी पासपोर्ट असून सदर पार्सलसाठी फिर्यादीचे आधारकार्ड वापरले असल्याचं सांगितलं. त्यावेळी फिर्यादी यांनी घाबरून कोणतेही पार्सल पाठवले नसल्याचे सांगितले.
त्यावेळी समोरील मोबाईलधारकाने तुम्ही तक्रार करु शकता, तुमचा कॉल नार्कोटिक्स डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतो, तुम्ही त्यांच्याकडून क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्या असं सांगून सदर कॉल ट्रान्सफर केल्याचा दिखावा केला. त्यानंतर नार्कोटिक्स क्राईम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून स्काइप अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडलं. त्यावरून फिर्यादी महिलेच्या नावाचं आधारकार्ड, बँक खात्याचा वापर, मनी लॉड्रिग, ड्रग ट्रॅफिकिंगसाठी केला जात असल्याचं सांगितलं. त्यातून तुम्हांला अटक सुद्धा होऊ शकते असंही आरोपींनी सांगितलं.
पोलीस मदत करत असल्याचं सांगितलं
त्यामधून बाहेर निघण्यासाठी पोलीस मदत करत असल्याचं दाखवून महिलेस स्काइप कॉल करून स्क्रिन शेअर करण्यास संगितलं. महिलेच्या दोन्ही बँकांची माहिती घेतली आणि बँक अकाऊंटवर बॅलन्स असल्याचे पाहून आरबीआयकडून खात्याची वैधता चेक करण्याचं कारण देत खातं सर्वेलन्समध्ये असल्याने हॅकर्सने सर्व हॅक केलं.
त्यावेळी महिलेचा पोलीस असल्याचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकूण २४ लाख ९९ हजार ९९८ रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. तिने थेट हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावत विविध भागतून पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गु.र.नं. ८८२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३६(३), ३४० (२), ३१८ (२), ३१६ (२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू




























Subscribe to my channel




