
Mumbai Crime : दादरमधील सुटकेस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणाचा २४ तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पायधुणी येथे अर्शद अली शेखची रविवारी हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह बॅगेमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी तुतारी एक्स्प्रेसने कोकणात जाण्याच्या प्रयत्नात होता. पण दादर रेल्वे स्थानकावर त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.
दादर रेल्वे स्थानकात लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेमध्ये मिळालेल्या मृतदेहाप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुक आणि कर्ण बधीर अर्शद अली शेखची (३० वर्षे) त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केली. आरोपींनी अर्शदची हत्या करताना आपल्या मित्रांना व्हिडीओ कॉल केला होता. अर्शदच्या हत्येचा व्हिडीओ सामच्या हाती लागला आहे. नग्न करून आणि हात-पाय बांधून आधी अर्शदला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह बॅगेमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. पण त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली.
|
|
हत्या करण्यात आलेला अर्शद अली सादीक शेख आणि आरोपी जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मित्र होते. तिघेही मूकबधिर होते. क्रिकेट खेळताना त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. हे तिघेही नेहमी एकमेकांना भेटत होते. रविवारी रात्री तिघांनी जयच्या घरी भेटण्याचा प्लान केला. तिघेही दारु प्यायला बसले होते. त्याचवेळी शिवजीत आणि अर्शद यांचे भांडण झाले. या भांडणानंतर संतापलेल्या शिवजीतने अर्शदचे हाय-पाय बांधले, त्याचे कपडे काढले. नग्न करून त्याला बेदम मारहाण केली. जयने व्हिडीओ कॉल करत इतर मित्रांना अर्शदची हत्या लाइव्ह दाखवली
शिवजीत मारहाण करत असताना अर्शद त्याच्याकडे हात जोडून विनंती करत होता. पण तो काही ऐकत नव्हता. अतिशय निर्दयीपणे तो त्याला मारहाण करतच राहिला. शिवजीतने जयच्या घरामध्ये पडलेल्या हातोडीने अर्शदच्या डोक्यावर वार केले. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या अर्शदचा जागीच मृ्त्यू झाला. हत्येनंतर शिवजीतने जयला धमकावत अर्शदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. जय एका बॅगेत अर्शदचा मृतदेह भरून दादर रेल्वे स्थानकावर गेला. त्याठिकाणी त्याने तुतारी एक्स्प्रेसने कोकणात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.
रविवारी रात्री उशिरा दादर रेल्वे स्थानकात बॅगेत मृतदेह सापडल्याने दादर रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती. अर्शदच्या हत्येप्रकरणी जय चावडा आणि शिवाजित सिंग यांना अटक करण्यात आली आहे. शिवजीत सिंगच्या मैत्रिणीला अर्शद अली त्रास देत असल्याच्या संशयावरून आणि पैश्याच्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस आरोपींची कसून चौकशी करत असून सर्व बाजूने तपास करत आहेत. दोन्ही आरोपी देखील मुक आणि कर्ण बधीर असल्याने तपासात पोलिसांना अनेक अडथळे येत आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




