अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट! दरवर्षी एक तरी सहकुटुंब ट्रिप व्हायचीच, तशी त्याही वर्षी आमची ट्रिप माहूर, शेगाव अशी निघाली होती. घरी देवीची उपासना असल्यामुळं शक्य होईल तेव्हा जाणं, येणं होतंच. क्रुझर आणि जाता येता जवळपास 700 किलोमीटरची रोड ट्रिप त्यामुळे आम्ही भावंडं खुश होतो. नांदेडला चहा घेतला आणि वाटलं झालं, अंधाराच्या आत गडापाशी पोहोचू! गाडीत बसता बसता बहीण म्हणाली, "तशी आजच मी एक स्टोरी वाचली फेसबुक वर. एक कुटुंब असंच कुठेसं प्रवासाला निघालं होतं. अंधार होता होता त्यांचा मॅप चुकला. तिथं भरपूर जंगल होतं. गुगल मॅप रस्ता दाखवत तर होतं, पण अंतर कमीच होत नव्हतं. त्यांना वाट मिळतही नव्हती आणि कुठे चाललोय ते कळतही नव्हतं. शेवटी कंटाळून मधेच गाडी उभी केली आणि बसून राहिले. पहाट होता होता लक्षात आलं फिरता फिरता पुन्हा सुरुवातीच्याच ठिकाणी पोहोचलेत. त्यांना चकवा लागला होता!" तिने सहज सांगितलेली गोष्ट ऐकून "काहीही", "बापरे! केवढं थ्रिल!" असे उद्गार करत आम्ही भावंडं गाडीत बसलो. आजी मात्र हे ऐकून म्हणाली, "दादा, दिवसा उजेडीच पोहोचव रे!" मजा, गप्पा, गाणी अशा सगळ्यात दोन एक तास गेले. आजीची चलबिचल सुरू होती. एव्हाना पोहोचायला हवं होतं. आणखी एक तास उलटला तरी रस्ता काही संपेचना! अंधार पडायला लागला. भाऊ मजेत म्हणाला, "माई तू गोष्ट काय सांगितलीस, आपल्यालाच तर चकवा नाही लागला नं?" आम्ही हसण्यावारी नेलं खरं, पण आमच्याही मनात ही शंकेची पाल चुकचुकली होतीच. अंधार गडद होत गेला. दुतर्फा भरपूर झाडी असलेल्या रस्त्यावर एव्हाना इतर वाहनंही दिसत नव्हती. कितीतरी वेळ आपली आमची एकच गाडी धावत होती. हळूहळू सगळ्यांनाच भीती वाटायला लागली. मोठ्यांना भीती वाटली तरी दाखवता थोडीच येते! आम्हा भावंडांच्या कल्पनाशक्तीला मात्र ऊत आला होता. पाहता पाहता जिथे दोन तासात पोहोचावं तिथे आम्ही चार तास होऊनही पोहोचलो नव्हतो. रेंजअभावी मॅप उपयोगीच पडत नव्हतं. शेवटी उगाच फिरत राहण्या अर्थ नाही म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि साधारण अर्ध्या तासात आम्हाला एका गाडीचा आवाज आला. एक स्विफ्ट डिझायर आमच्या शेजारून पुढे गेली. झालं, आम्ही क्षणाचाही उशीर न करता कसे कोण जाणे त्या गाडीच्या मागे निघालो. थोड्याच वेळात मॅपची रेंज आली आणि आमच्या जीवात जीव! एका वळणाशी मग ती स्विफ्ट वळली आणि दिसेनाशी झाली. आम्ही टर्न राईट आफ्टर 500 मीटर्स ही सूचना ऐकून पुढे आलो. एक तासाभरात माहूर मधे होतो! जे दोन तासात होईल असं वाटलं होतं तिथे पोहोचायला तब्बल सहा तास गेले! खाली उतरल्या उतरल्या आजी म्हणाली, "देवीमाते, आणलंस बाई सुखरूप!" आम्ही काही म्हटलं नाही, पण सगळ्यांच्या मनात अगदी हेच होतं! खरंतर आज इतक्या वर्षांनी हा प्रसंग आठवतो तेव्हा वाटतं, त्या काही तासात किती भीती होती मनात, केवढ्या शंका होत्या. आपल्याला चकवा लागल्याची जवळपास खात्री होती! गाडी बिघडणं, पेट्रोल संपणं, अशा किती शक्यता डोक्यात पिंगा घालत होत्या. पण कुठंतरी मन म्हणत होतं, काही ना काही मार्ग नक्की निघेल. ती स्विफ्ट पाहिल्यावर पहिला विचार होता, 'कोण माणूस धावून आला देवासारखा'. त्या अंधाराल्या रस्त्यांवर आमच्या पुढे धावणाऱ्या त्या गाडीचे लाईट किती आश्वासक वाटले होते! वाटतं आम्ही त्या चकव्यापासून वाचू शकलो. कारण कुठेतरी, सगळ्या भीतीपलीकडेही मनाला पक्कं ठाऊक होतं, 'देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपण इथून बाहेर पडू शकतो'. भवताल जेव्हा अस्वस्थ करणारं असतं, जागतिक स्तरावरच्या घडामोडींचे पडसाद आपल्या आसपास कुठे कुठे उमटताना दिसतात तेव्हा मग मनावर मळभ येणं साहजिकच आहे. उज्ज्वल भविष्याची आणि कधी कधी वर्तमानतल्या घटनांमुळे आजचीसुद्धा मनभर पसरत जाणारी काळजी असतेच, पण या सगळ्या चक्रव्यूहात अडकून, शंकांच्या जंजाळात आपल्याला चकवा लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हा छोटासा प्रसंग जेव्हा जेव्हा मला आठवतो तेव्हा वाटतं आपल्या स्वतःपुरत्या कितीतरी गोष्टी ह्या आपल्या मनातच सुरू होतात नि मनातच संपतात. एक दिवस सगळं पूर्ववत नि चांगलं होईल हा विश्वास जर आपण मनात बाळगून असलो तर सगळ्या जटिल शंका दूर होतील आणि आपणही आनंदी राहू शकू! यावरच चार ओळी लिहिल्या होत्या... काळोखभरली रात्र, सोसाट्याचं वादळ प्रत्येकात सुरू असतं कधी ना कधी.. पण मग प्रत्येकानं पाहावं एकदा दूरवर, दिसेल एकतरी मिणमिणणारी पणती. तिचं असणं जाणीव करून देत राहील, अंधारापुढल्या प्रकाशाच्या अटळ अस्तित्वाची! संबंधित कॉलमचे इतर भाग मुक्तछंद:जयश्री आलूरकरांच्या कथासंग्रहातले माणूसपणाचे झरे; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...! मुक्तछंद:मामाचा गाव, चिंचेच्या झाडाला बांधलेला झोका अन् पिंपळाचा पार; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये धुंद नाती गंधावणारी! मुक्तछंद:सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर, पण पाहतो का आपण?; वाचा मानसी वैद्य यांचा हुरहुर लावणारा कॉलम! मुक्तछंद:कविता न सुचलेले दिवस, उजळण्यामागचं जळणं आणि दोन कोवळी पानं फुटावित असं दान मागणारं दासूंचं 'तथापि'...! मुक्तछंद:अंतिम क्षणी थोडे रंग आणि 'हायकू' घेऊन येणारा चंद्र; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...! मानसी वैद्य यांचा कॉलम:जग जरी इतकं मोठं, हसू त्यात मावणार नाही...'मुक्तछंद' हे नवंकोरं सदर, वाचायला विसरू नका!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

