
Maharashtra Rain Alert : देशासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जोरदार पाऊस होईल, असंही आयएमडीने सांगितलं आहे. आजपासून पुढील 10 दिवस देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे.परंतु, द्वीपकल्पीय भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर पाऊस कमी होऊ शकतो. अल निनोचा प्रभाव संपल्याने आता ला लिनाचा प्रभाव जाणवू लागलाय. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आज कुठे कुठे कोसणार पाऊस?
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज शनिवारी कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात विजांसह कडकडासह जोरदार पाऊस होऊ शकतो. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय
|
Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचं आव्हान |
या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
तर पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दुसरीकडे मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह आसपासच्या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजी, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनुसार, सध्या अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. दुसरीकडे ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला ला निना पॅटर्न विकसित झाल्यामुळे भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. IMD ने म्हटले आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतात सरासरी 422.8 मिमीपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




