
Pune : महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार करणारा वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेष वैद्य याला अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे कारनामे उघड झाल्यानंतर आरोपी ऋषिकेष वैद्यच्या अत्याचाराने पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलिसांकडे धाव घेतली. तिने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा पुण्यात घडला असल्याने वसई पोलिसांनी तपासासाठी मांजरी पोलिसांकडे वर्ग केला होता. याप्रकरणी आरोपी ऋषिकेष वैद्य याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी चार पथके तयार केली होती. अखेर पुण्याजवळील पिंपरी शहरातून पोलिसांनी आज त्याला अटक केल्याचे समजते.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ‘वसईतील स्यवंघोषित धर्मगुरू आणि ‘आमची वसई’ ही सामाजिक संघटना चालवणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात नुकतीच पुण्यातील ३५ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली होती. हा गुन्हा पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी आम्ही चार पथके तयार केली असून ती विविध जिल्ह्यांत त्याचा शोध घेत आहेत, त्याच्या विरोधातील गुन्ह्यांत आणखी कलमांची वाढ केली जाईल,’ अशी माहिती पुणे शहराचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानंतर वैद्य हा आपल्या नातेवाईकांकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पिंपरीतून अटक केली असून आज दुपारी त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरातने उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनांनी राज्यात गदारोळ माजला असतानाच, देवाचा अवतार असल्याची बतावणी करून वसई येथील एका भोंदूने महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
हृषीकेश वैद्य असे या भोंदू बाबाचे नाव आहे. त्याच्याविरोधात एका ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये समाजमाध्यमांतून तिची ओळख वसई येथील हृषीकेश वैद्य याच्याशी झाली. पीडित महिला धार्मिक असून, व्रतवैकल्ये करते. आरोपीने तिला जाळ्यात ओढले. ‘माझ्यामध्ये दैवी शक्तींचा संचार असून, ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र मी तुला शिकवतो,’ अशी बतावणी त्याने केली. हळूहळू त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. नंतर तिला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलावले. त्यानंतर आरोपी २०२३मध्ये पुण्यात आला. त्याने महिलेला मांजरीतील एका लॉजवर नेऊन गुंगीकारक औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्या वेळी त्याने काही छायाचित्रे काढून तिला धमकावण्यास सुरुवात केली. आरोपीने तिला वसईत बोलवून तिथेही तिच्यावर अत्याचार केला, असे पीडितेच्या तक्रारीत नमूद आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel




Partner with us and enjoy high payouts—apply now!