
Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषण आणि आंदोलनही केली. मात्र, राज्य सरकारने अद्याप त्यांच्या मागणीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला ओबीसींनी विरोध केल्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे.
आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर २८८ उमेदवार निवडणुकीत उभे करण्याबाबत मनोज जरांगे यांनी अनेकदा सूचक विधानं केली आहेत. याचसंदर्भात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक महायुती बरोबर लढणार की नाही? याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर राहून बंदूक मारण्यापेक्षा निवडणुकीत उतरलं पाहिजे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
|
Pune : “ते नसताना पुण्यात धरण वाहिलं”; पुण्यातील पूरस्थितीवरुन राज ठाकरेंची अजित पवारांवर टीका |
महादेव जानकर काय म्हणाले?
“विधानसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप काही ठरलेलं नाही. सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. महायुतीमध्ये सहभागी होत असतना मीच सांगितलं होतं की, आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची नाही. कारण आपल्या कार्यकर्त्यांची ताकद किती आहे? हे आम्हाला त्यावरून कळतं. युतीत असलं की मग त्याच पक्षांच्या जीवावर चालावं लागतं आणि आपल्या पक्षांचे कार्यकर्तेही असा विचार करतात की युती आहे मग नको जास्त लक्ष द्यायला. त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाबरोबर युती करणार नाहीत. मात्र, लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करायला तयार असतो”, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगेंना सल्ला
महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आणि ओबीसी आरक्षणच्या मुद्यावरही भाष्य केलं. तसेच मनोज जरांगे यांनाही एक राजकीय सल्ला जानकरांनी दिला. ते म्हणाले, “बाहेर राहून बंदूक मारण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. ते निवडणुकीत उतरले तर मी त्यांचं स्वागत करेन. आपण काही म्हणण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा त्यामध्ये उतरलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




