
Pune : यंदाच्या पावसाळी हंगामातीलच नव्हे, तर गेल्या काही वर्षांतील सर्व उच्चांक मोडीत काढून बुधवारी रात्री आणि गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरात ‘आषाढ’मेघ बरसले. त्यामुळे खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी आणि पुन्हा सायंकाळी ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्याचा फटका नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) आणि इतर सखल भागांना बसला. पुणे महापालिकेने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि लष्कराच्या मदतीने गुरुवारी दिवसभरात चार हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी, चऱ्होली, थेरगाव, चिंचवड, पुणे-मुंबई रस्ता या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पुणे शहरासह जिल्ह्यातील पश्चिम घाटात बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात; तसेच लवासा येथे दरड कोसळली. घाट परिसरात पावसाचा जोर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पर्यटनस्थळे दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थितीचे बचावकार्य करण्यासाठी लष्कर; तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी गुरुवारी माध्यमांना दिली.
|
Maval : मावळमधील कुंडमळ्यात पर्यटकांना बंदी; पाणी पातळीत वाढ, कुंडदेवी मंदिर पाण्याखाली |
शहर आणि परिसरात आज, शुक्रवारी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून, घाटांच्या परिसरात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी गुरुवारपाठोपाठ आज, शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी गरजेनुसार बाहेर पडावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.
विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे गुरुवारी पहाटे मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यावर अंडा भुर्जीचा गाडा सुरक्षित ठिकाणी नेताना विजेचा धक्का बसून तिघांचा मृत्यू झाला. या गाड्यासाठी बेकायदा वायर टाकून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
ताम्हिणीमध्ये २४ तासांत ५५६ मिमी
ताम्हिणीमध्ये गुरुवारी अतिवृष्टी झाली. अवघ्या चोवीस तासांत ताम्हिणीच्या घाटमाथ्यावर ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या घाटात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या रविवारपासून ताम्हिणीमध्ये एकूण १२५४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. लोणावळ्यातही गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ३२९ मिमी, तर सायंकाळी साडेपाचपर्यंत ११७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

