
Pune - पाषाण परिसरातील दोन गर्भवती आणि उजवी भुसारी कॉलनीतील १५ वर्षांचा मुलगा अशा तीन जणांना झिका विषाणूच्या संसर्गाचे निदान मंगळवारी झाले. त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या पंधरापर्यंत वाढल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर घरातच उपचार सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
आतापर्यंत एरंडवणे, मुंढवा, डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बुद्रूक, खराडी आणि कळस या भागात रुग्ण आढळले आहेत. त्यात आठ गर्भवतींचा समावेश आहे. गर्भवतींचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
दोन तरुणींना संसर्ग असल्याचे निदान प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले. एक तरुणी १८ वर्षाची असून ती २८ आठवड्यांची गर्भवती आहे. दुसऱ्या तरुणीचे वय १९ असून ती २३ आठवड्यांची गर्भवती आहे. त्यांना सांधेदुखी आणि डोकेदुखी ही ठळक लक्षणे दिसत होती. त्यांचा घसा खवखवत होता. त्यामुळे त्यांचे रक्तनमूने तपासण्यासाठी घेण्यात आले होते.
|
|
दृष्टिक्षेपात संसर्ग
• पुरुष-४
• महिला-११
• गर्भवती - ८
• सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - ४२,७५९
• अळी सर्वेक्षण केलेली घरे - १३,००४
• अळी आढळलेली घरे ३५४
लक्षणे
• ताप
• पुरळ
• डोकेदुखी
• सांधेदुखी
• डोळे लाल होणे
• स्नायूदुखी
झिका कसा पसरतो?
झिका हा विषाणू एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासांच्या मादीमुळे पसरतो. लैंगिक संबंध किंवा गर्भवतींकडून बाळाला झिकाचा संसर्ग होतो.
प्रतिबंधात्मक उपाय
• डासोत्पत्ती टाळणे
• डास चावू नयेत याची काळजी
• लांब बाही असलेले शर्ट आणि लांब पेंट वापरणे
• घरापाशी पाणी साचू देऊ नका
उपचार कसे करतात?
झिकावर निश्चित उपचार नसल्याने रुग्णाला दिसणाऱ्या लक्षणांवर औषधे दिली जातात. भरपूर पाणी पिणे, पुरेशी विश्रांती आणि सात्त्विक आहार यातून रुग्ण बरे होऊ शकतो.
शहरात झिकाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वेक्षणाचा वेग वाढविला आहे. रुग्ण आढळलेल्या भागातील गर्भवतींच्या तपासणीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. सर्वेक्षण चांगले होत असल्याने रुग्ण लवकर उपचाराखाली येत आहेत. गर्भवतींमधील संसर्गाचा धोका टाव्दण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवतींचे सर्वेक्षण आणि संशयितांची तपासणी करण्यात येत आहे, तसेच मुंढवा, पाषाण, खराडी आणि कळस परिसरातील ३१ महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेकडे पाठवले आहेत.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र


























Subscribe to my channel



