Devendra Fadnavis : विरोधकांचा खोटा उत्साह, बजेटमुळे संपला; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घणाघात

Devendra Fadnavis : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात अंतरिम संकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शेतकरी ते महिलांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'विरोधकांचा खोटा उत्साह, बजेटमुळे संपला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली.

'उद्धव ठाकरे म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. पण हा मायबापांचा अर्थसंकल्प आहे. आता विरोधीपक्ष बोलत होते. त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. चेहरे उतरलेले होते, केवळ टीका करत होते. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात इतिहास करणार आहे. जे जे कबूल केलं आहे. ती प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करून दाखवून देऊ. हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. निवडणुकीचा नाही, असे फडणवीस म्हणाले.
 
'विरोधक आधीच लिहून आणतात की, काय बोलयाचं आहे. त्यांचा उत्साह खोटा होता. निवडणुकीत निकालातून जो आला होता. तो आजच्या बजेटमुळे संपला आहे,असेही फडणवीस पुढे म्हणाले.
 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *