Pune : पिंपरी- चिंचवडमध्ये रिल्स बनवत वाहनांची तोडफोड; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

Pune : पिंपरी- चिंचवडमध्ये वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन तीन मुलांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत रिल्स बनवल्याची घटना समोर आली आहे. कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान केलं आहे. ही घटना मध्यरात्री थेरगाव येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अज्ञात तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव येथे कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दोन अल्पवयीन मुलांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिसऱ्या अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध घेत आहेत.

Alandi : पंढरपूर वारी आली तरी इंद्रायणी फेसाळलेलीच! वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, प्रशासन कधी जागं होणार?

दरम्यान, कोयत्याने वाहनांच्या काचा फोडत असताना दुसरा मुलगा रिल्स काढत होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडचं सत्र थांबलेले होतं. आता पुन्हा वाहन तोडफोडीने डोकं वर काढलं आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस घेत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *