Pune Crime : सावत्र बापाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; अश्लील वर्तन करत दिले चाकूचे चटके, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime : पुण्यामधून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सावत्र बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकलीला चाकूने चटके दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.सुनील चौहान, असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ते १४ जून दरम्यान घडली. ४ वर्षीय चिमुरडी अनेक वेळा रडत होती. तिच्या हातावर चटके दिल्याचे वण होते. यावर तिच्या शाळेतील एका शिक्षिकेने तिला विचारलं आणि तिने हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याची माहिती मिळत आहे.

Purandra Airport : पुरंदर विमानतळाच्या अडचणी संपुष्टात; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

या चिमुरडीची आई आणि आरोपीचे प्रेम संबंध आहेत. ते दोघेही मजूर आहेत. आरोपी या लहान मुलीचे सावत्र वडील आहेत. त्यामुळे सुरवातीला या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र पोलिसांना आता तिने स्वत:च तक्रार दिली आहे. आरोपी या लहान मुलीशी अश्लील वर्तनकरत होता. तसेच अनेक वेळा त्याने चाकू गरम करून तिला चटके सुद्धा दिलेत, असं तक्रारीत म्हटले गेलं  आहे.

सावत्र बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या शिक्षिकेने विचारपूस केल्यामुळे ही घटना उघड झाली आहे. आरोपी वारंवार पीडितेचा छळ करत होता, त्याने या चिमुकलीला अनेकदा चटके देखील दिले होते. घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरून गेली होती. पोलीस आरोपीवर कारवाई करत आहेत.
 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *