
Buldhana News : मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशन हद्दीत एका सहा वर्षीय बालकाचे अपहरण झाल होत. 26 मे 2024 रोजी ही घटना घडली असून मोहम्मद आसिफ असे या अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना उजेडात येताच मोहम्मद आसिफ याच्या कुटुंबीयांनी याबाबत पायधूनी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, अखेर मुंबईवरुन अपहरण झालेल्या या बालकाची शेगाव येथे सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे एका बालकांचे सुखरूप सुटका झाल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. मात्र यातील अपहरणकर्ते नेमकं कोण? हे अद्याप कळू शकलेले नाही. परिणामी, सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
सहा वर्षीय बालकाची शेगाव येथे सुटका
6 वर्षीय मोहम्मद आसिफ अचानक गायब झाल्याच्या घटणेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मोहम्मद आसिफच्या कुटुंबीयांनी मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना देत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र गतिमान करत या बालकाचा शोध सुरू केला. त्यानंतर एक बालक कोलकाताकडे जाणाऱ्या ट्रेन नं 12869 मध्ये असल्याचं पोलिसांना समजले. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ कोलकाताकडे जाणाऱ्या सर्व स्टेशन्सला याबाबत सूचना दिल्या.
|
|
पोलिसांची कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक
या सूचनेनुसार शेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी गुप्तहेर पाठवून अपहरण झालेलं बालक एस 7 कोच मध्ये बसलेला असल्याचं माहीत दिली. त्यानंतर ही ट्रेन शेगावला येताच या बालकाला रेस्क्यू केलं आणि त्याची माहिती मुंबई पोलिसांना कळविण्यात आली. त्यावरून काल त्या बालकाला विधिवत कार्यवाही पूर्ण करून
मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या सहा वर्षीय चिमुकला दूसरा तिसरा कुणी नसून मोहम्मद आसिफच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अपहरणकर्त्याच्या तावडीतून या बालकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.परिणामी, पोलिसांच्या या कामगिरीने पुन्हा आरपीएफ विभागाचे नाव उंचावले आहे.शेतात काम करणाऱ्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. संग्रामपूर येथे उष्माघाताने शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सचिन वामनराव पेठारे असं उष्माघाताने मृत्यू पावलेल्या 40 वर्षीय मजुराचं नाव आहे. सचिन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असून तो शेत मजूर म्हणून काम करत होता. सचिन वामनराव पेठारे याची तामगाव पोलिसांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!




























Subscribe to my channel
