Ahmednagar : सुपा बसस्थानक ते पारनेर रस्त्याने घेतला माेकळा श्वास, शेकडाे अतिक्रमणे जमीनदाेस्त

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथे शनिवार सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंत शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

सुपा पारनेर रोडवरील अनेक पक्की आणि पत्र्याची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत. प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत.

Pune Car Accident : पुण्यातील ४९ पब, बारवर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई; सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावरही पोलिसांची छापेमारी

सुपा बस स्थानकापासून ते पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या आधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या.

रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावे यासाठी अतिक्रमण रेषा ही आखून दिली होती. तरीही अतिक्रमण काढले गेले नसल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने मोहीम राबवली गेल्याची माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *