
India Weather Forecast : देशामध्ये सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. काही राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. वाढत्या तापमानामुळे या राज्यांमधील जनता त्रस्त झाली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे.
उन्हाच्या तडाक्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे रेड अलर्ट जारी केला आहे.
|
NIA Raid : ब्रेकिंग! एनआयएकडून देशभरात ११ ठिकाणी छापेमारी; रामेश्वरम कॅफे प्रकरणात कारवाई |
राजस्थान -
भारतातील सर्वात उष्ण राज्यांच्या यादीत राजस्थान हे राज्य आघाडीवर असते. यावर्षीच्या उन्हाळ्यात येथील वातावरण अतिशय उष्ण आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये उन्हाचा पारा चढणार आहे. या ठिकाणी शनिवार आणि रविवारपर्यंत तापमान 46 अंशांवर पोहोचेल, असा अंदाज आहे.
मध्य प्रदेश -
मध्य प्रदेशमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. याठिकाणी उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बुरहानपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा उच्चांकावर पोहोचला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात येथील पारा ४५ अंशांच्या आसपास राहणार आहे.
उत्तर प्रदेश -
उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट आहे. राज्याची राजधानी लखनऊमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे जात आहे. परंतु या आठवड्यात तापमान 42-43 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी, नोएडा आणि गाझियाबादमध्ये तापमान 43 अंश आहे. याशिवाय आग्रामध्ये तापमान ४५ अंशांच्या जवळ आहे.
दिल्ली -
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देशाची राजधानी दिल्लीमध्ये उष्णतेची लाट आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या 10 दिवस अगोदर जाहीर केल्या आहेत. दिल्लीत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात दिल्लीत कडक ऊन पडणार आहे. शनिवार आणि रविवारपर्यंत तापमान 46 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
केरळ आणि तामिळनाडू -
एकीकडे उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट आहे. तर दुसरीकडे भारताच्या दक्षिण भागात पावासाने कहर केला आहे. दक्षिण भारतातील राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे केरळ आणि तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमधील 4 जिल्ह्यांमध्ये तसेच राजधानी तिरुवनंतपुरममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- धाराशिव: मराठा आरक्षणावरून संतापाचा लाव्हा उसळला! उमरगा तहसील कार्यालयात घुसून आंदोलकांनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची; चौघे जण ताब्यात
- कोल्हापुर: माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा, शिरोळमध्ये गेट तोडले; थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हल्ल्याचा इशारा
- यवतमाळ: सहकार विभागाची कठोर कारवाई! लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना नोटिसा जारी, सहकार वर्तुळात खळबळ
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल




























Subscribe to my channel



