
Nashik : दैवी शक्ती, भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या कुकर्मांचा पेटारा आता उघड झाला आहे. खरातच्या ४८ मालमत्तांची कागदपत्रे एका तरुणाने पोलिसांत दिली असून, खरातच्या गैरकृत्यांचे सबळ पुरावे असणारा ‘पेन ड्राइव्ह’ देण्याचाही दावा केला आहे. यासह एका गर्भवतीचा, तर अन्य एका महिलेवर खरातने लैंगिक छळ केल्याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्याने खरातविरुद्ध अत्याचारासह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये तिसरा गुन्हा नोंद झाला आहे.
कुकर्मांची संपूर्ण ‘कुंडली’ उघड
नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत २८ वर्षीय पीडित महिलेने १७ मार्च २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अशोककुमार खरातविरुद्ध अत्याचारासह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे, तर रविवारी खरातच्या कार्यालयातील पूर्वाश्रमीच्या कर्मचाऱ्याने खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामध्ये सबळ पुरावे फिर्यादीने सादर केल्याने खरातच्या कुकर्मांची संपूर्ण ‘कुंडली’ पोलिसांसमोर आता खुली झाली आहे. त्यामुळे खरातच्या अडचणींत वाढ झाली असून, त्याची पोलिस कोठडी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खरातच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांत डिसेंबर २०२५ मध्ये दोन संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद आहे. शिर्डी पोलिसांत एका पीडितेच्या फिर्यादीवरून खरातच्या ‘ऑफिस बॉय’विरुद्ध फेब्रुवारी २०२६ महिन्याच्या अखेरीस गुन्हा नोंद आहे. नाशिकच्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार १७ मार्च रोजी एक आणि २२ मार्च रोजीचा दुसरा असे एकूण चार गुन्हे आता ‘एसआयटी’च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, नाशिकचे आयजी दत्तात्रेय कराळे यांनी खरातला पाठीशी घातल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. कराळे यांच्यासोबत खरात याचा फोटो आहे. खरातवर गेल्या वर्षी गुन्हा का नोंदला नाही? कारण आयजी कराळे तेथे आहेत, असा आरोप देसाई यांनी केला.
‘एसआयटी’ तपासातून...
संशयित खरातची महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या गोपनीय ठिकाणी रविवारी दिवसभर चौकशी
संशयित खरातची नवीन गुन्ह्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकमार्फतही चौकशी
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कौशल्यामुळे नवीन फिर्यादी समोर
पीडितेच्या पतीने खरातच्या ४८ ठिकाणच्या मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांना दिली
खरातच्या गैरकृत्यांचे व्हिडीओ असलेला पेन ड्राइव्ह पोलिसांना देण्याचे फिर्यादीकडून मान्य
संशयिताचे मोठे प्रस्थ व ओळखीमुळे फिर्यादी सुरुवातीला तक्रार देण्यास भीत होता
रानटी चिंचोक्यांची विक्री
खरात हा धार्मिक विधी व भविष्यवाणीच्या नावे अघोरी कृत्य करायचा. बाजारातून शंभर रुपये किलो दराने मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करायचा. कापडाने घासून स्वच्छ केल्यानंतर ते खड्यासारखे चमकायचे. हे चिंचोके खरात ऑफिसमध्ये येणाऱ्यांना मंत्रून दहा हजार ते एक लाख रुपये दराने विक्री करायचा. नाशिकरोड येथील एक व्यक्ती हे नकली खडे खरातला आणून द्यायचा. यासह खरात हा पाच इंच जाड व वेगवेगळ्या लांबीची प्लॅस्टिकची पिवळी, नकली कापडी वाघ आणि नकली प्लास्टिकचा साप खरेदी करायचा. या साहित्यांद्वारे मिरगावच्या मंदिरात भाविकांना घाबरवून खरात ‘वसुली’ करायचा. त्यावेळी मिरगावच्या मंदिरात सेलिब्रिटी, राजकीय व्यक्ती आलिशान कारमधून खरातकडे यायचे. त्यांना मंदिरात पूजा करण्यास सांगून फोटो व व्हिडीओ खरात तयार करायचा, असेही समोर येत आहे.
‘एआय’च्या फोटो, व्हिडीओप्रकरणी गुन्हे
संशयित खरात याच्यासमवेत उभ्या असलेल्या किंवा त्याच्या कार्यालयात असलेल्या महिलांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतांश फोटो व व्हिडीओ ‘एआय’द्वारे तयार केलेले आहेत. यासह काही फोटो व व्हिडीओ 'मॉर्फ' केलेले आहेत. या संदर्भात सायबर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, पीडितांसह संबंधित महिलांची बदनामी करणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत.
खरातमुळे महिला गर्भवती
एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आणखी पीडितेवरील अत्याचार प्रकरणी तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेवर १ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२६ दरम्यान अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित खरातने ३३ वर्षीय महिलेला कार्यालयात बोलावले. कार्यालयात एकांतात असताना तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याने खरातने औषध देत गर्भपात घडवून आणला.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



